ETV Bharat / state

कुलगुरू निवडीनंतरही नव्या कुलगुरूंचा शोध घेण्याची गोंडवाना विद्यापीठावर वेळ

author img

By

Published : Jun 14, 2021, 9:09 PM IST

Updated : Jun 14, 2021, 9:29 PM IST

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरूपद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये दिल्लीच्या आयआयटीमधील प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरू म्हणून राज्यपाल यांनी नियुक्ती जाहीर केली. मात्र ते येथे रुजू न झाल्याने नव्याने कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्याची वेळ गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठावर आली आहे.

Gondwana University to find a new Vice-Chancellor

गडचिरोली - चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी गडचिरोलीत स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरूपद गेल्या नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये दिल्लीच्या आयआयटीमधील प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरू म्हणून राज्यपाल यांनी नियुक्ती जाहीर केली. मात्र ते येथे रुजू न झाल्याने नव्याने कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्याची वेळ गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठावर आली आहे.

विशेष म्हणजे, प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची निवड करताना विद्यापीठातर्फे जी प्रक्रिया राबविण्यात आली, त्यासाठी तब्बल 38 लाख रुपये खर्च आला. मात्र ते येथे रुजू न झाल्याने विद्यापीठाला चांगलाच भुर्दंड बसला आहे. सोमवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता, नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना

निवड प्रक्रिया राबवण्याचा 38 लाखांचा खर्च पाण्यात -

राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उच्च शिक्षणाची गंगा नेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश यात करण्यात आला. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे विद्यापीठाला नऊ महिन्यांपासून पूर्णवेळ कुलगुरू मिळालेले नाही. चार महिन्यांपूर्वी कुलगुरू निवडीकरीता प्रक्रिया घेण्यात आली आणि दिल्ली आयआयटी येथील प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरू म्हणून राज्यपाल कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी कुठलेही कारण न देता रुजू होण्यास नकार दिल्याने प्रशासनावर पुन्हा निवड प्रक्रिया राबविण्याची नामुष्की ओढावली आहे. तसे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले. या प्रक्रियेवर विद्यापीठाचे 38 लाख रुपये खर्च झाले. निवड करण्यात आलेल्या कुलगुरुंना रुजूच व्हायचे नव्हते तर मग त्यांची नियुक्ती का करण्यात आली, हा प्रश्र विद्यार्थी संघटनांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.

कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेचा खर्च शर्मा यांच्याकडून वसूल करा-

कुलगुरू पदाकरीता अर्ज करताना डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांना सर्व प्रक्रियेची कल्पना होती. निवडीच्या वेळेस त्यांचे सुद्धा मत घेण्यात आले होते. तरीसुद्धा कुठलेही कारण न देता शर्मा यांनी रुजू होण्यास नकार दिला. नवे विद्यापीठ त्यात निधीची चणचण असताना विद्यापीठावर 38 लाखांचा भुर्दंड बसला. इतकेच नव्हे तर शर्मा यांनी विद्यापीठ प्रशसनासोबत याबाबत संपर्क करणेही योग्य समजले नाही. त्यामुळे हा खर्च शर्मा यांच्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

पदभरती प्रक्रिया रखडली -

पूर्णवेळ कुलगुरू नसल्याने विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक आणि कर्मचारी यांची पदभरती रखडलेली आहे. सध्या कुलगुरुंचा प्रभार रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे आहे. गतवर्षी विद्यापीठाने सहायक प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात काढली होती. परंतु ती प्रक्रिया सुद्धा खोळंबली आहे. सोबतच जनसंपर्क अधिकारी पदाची भरती सुद्धा झालेली नाही. मान्यता असताना सुद्धा प्रशासकीय उदासीनतेमुळे पदभरती खोळंबली आहे.

Last Updated : Jun 14, 2021, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.