ETV Bharat / state

गडचिरोली नक्षली हल्ला : ४० नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल - attack

नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला होता. या प्रकरणी ४० नक्षलवाद्यांविरोधात हत्या व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४० नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : May 4, 2019, 10:23 AM IST

Updated : May 4, 2019, 10:35 AM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १५ जवान व एका वाहन चालकाला वीरमरण आले होते. या प्रकरणी ४० नक्षलवाद्यांविरोधात हत्या व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोलीमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला. पुराडा पोलीस ठाण्यात भूसुरुंगस्फोट व जाळपोळ प्रकरणी उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख नक्षली नेता भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसभा निवडणुकीसाठी गडचिरोलीमध्ये झालेल्या मतदानात आदिवासींनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. नक्षलवाद्यांनी आदीवासींनी मतदान करण्यास मनाई केली होती मात्र आदीवासींनी याला जुमानले नाही. याच रागातून नक्षलवाद्यांनी हल्ला केला, असे सांगितले जात आहे.

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सी-६० पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १६ जवानांना वीरमरण आले. यानंतर पोलिसांकडून परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.

  • शुक्रवारी सकाळी घटनास्थळी AK-४७ बंदुकीचे भरलेले २ मॅगझीन या परिसरात आढळून आले.
  • दादापूर येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी बॅनर लावले होते.
  • नक्षलवादी हल्ला दुर्दैवी असून नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे डीजीपी जैस्वाल यांनी म्हटले होते.
  • नक्षलवाद्यांनीविरोधात आमचा प्लॅन तयार असल्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 4, 2019, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.