ETV Bharat / state

गडचिरोली युवक काँग्रेसतर्फे 'सेवाव्रर्ती' परिचारिकांचा सत्कार - yuvak congress felicitate nurse gadchiroli news

जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्या वतीने मागील 18 दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्यात येत आहे. याच ठिकाणी बुधवारी सकाळी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हाताने रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत करण्यात आले.

gadchiroli yuvak congress felicitate nurses
गडचिरोली युवक काँग्रेसतर्फे 'सेवाव्रर्ती' परिचारिकांचा सत्कार
author img

By

Published : May 12, 2021, 9:39 PM IST

गडचिरोली - युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या लढ्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिकांचा सत्कार केला. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात शाल व भेट वस्तू देऊन हा सत्कार करण्यात आला.

भोजनाचे वितरण -

जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्या वतीने मागील 18 दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्यात येत आहे. याच ठिकाणी बुधवारी सकाळी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हाताने रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत करण्यात आले. त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, डाॅ. चंदा कोडवते, डॉ. मेघा सावसागडे व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - Mucormycosis : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा कहर, राज्यभर सापडत आहेत रुग्ण

यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ.चंदाताई कोडवते, रजनीकांत मोटघरे, डॉ.मेघा सावसागडे, गौरव एनप्रेद्दीवार, प्रवीण रहाटे, रहीम भाई लोडिया, संजय चन्ने, तोफिक शेख, रवी गराडे, अब्दुल्ला भाई लालानी, मोहेश भाईदेवानी, इलीया सुरांनी, अमित कडीवाल सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.