ETV Bharat / state

बजरंगदलाच्या मदतीने ६५ गोवंशांना पोलिसांकडून जीवनदान; तीन ट्रक ताब्यात - गडचिरोली पोलीस ताज्या बातम्या

तीन संशयित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यात तब्बल ६५ जनावरांना कोंबून ठेवण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने या गोवंशांना जीवदान दिले आहे.

गडचिरोली पोलीस
गडचिरोली पोलीस
author img

By

Published : Oct 10, 2020, 9:38 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील आष्टी ते अहेरी महामार्गवर दीना नदी ते सुभामग्राम दरम्यान, 65 गोवंशाची वाहतूक करीत असताना अहेरी पोलिसांनी कारवाई करत 3 ट्रक जप्त केले. यासह पोलिसांनी जनावरांची सुटका करून कोंडवाड्यात टाकण्यात आले आहे.

अहेरी पोलीस रात्रीच्यावेळी बोरी येथे गस्तीवर असताना पहाटे 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान (TS 12-UC-9336 , TS-12-U-8749 आणि MH-40- 3317) क्रमांकाचे तीन ट्रक आष्टीवरून अहेरीकडे येत असताना पोलिसांनी हात दाखवून थांबवण्यास सांगितले. मात्र, चालकांनी ट्रक न थांबवता आणखी स्पीड वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ट्रक थांबविले असता अंधाराचा फायदा घेऊन तीनही ट्रकचे ड्रायव्हर पडून जाण्यास यशस्वी झाले आहेत. मात्र, ट्रकमध्ये झोपलेल्या दोन क्लिनरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले असते, हातपाय बांधून ट्रकमध्ये कोंबून ठेवलेले गोवंश त्यांच्या निदर्शनास आले आहे. यासोबतच मदतीसाठी पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोन केला. यानंतर जिल्हा सहसंयोजक देवेंद्र खतवार, विनोद जिलेला, अनिल गुरनुले, पवन दोंतुलवार आणि इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाजवळच्या बोरी येथील 22 व रायपूर पॅच येथील कोंडवाड्यात 47 गोवंश उतरविण्यात आले. त्यापैकी 4 जनावरे मृत्युमुखी पडले होते. जिवंत उतरवलेल्या गोवंशामध्ये आणखी काही जनावरांची स्थिती नाजूक आहे. दरम्यान, तीनही ट्रक अहेरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा - 'गुन्हे घडतच असतात, त्यांना मोदी रोखू शकत नाहीत' काँग्रेस नेत्याचे बेताल वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.