ETV Bharat / state

गडचिरोली पोलिसांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी - गडचिरोली जिल्हा बातमी

लाहेरी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या आदिवासी कुटुंबियांसह दिवाळी साजरी केली.

उप पोलीस ठाणे
उप पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 30, 2020, 7:23 PM IST

Updated : Nov 30, 2020, 8:05 PM IST

गडचिरोली - लाहेरी येथील पोलिसांनी कोयर येथील आदिवासी व गरीब कुटुंबियांसह दिवाळी साजरी केली आहे. हे उपक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर राबविण्यात आले.

फराळ देताना पोलीस

छत्तीसगड सीमेवर असलेल्या भामरागड तालुक्यातील लाहेरी उप पोलीस ठाणे परिसरातील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. तरीही लाहेरी पोलिसांनी आपल्या कार्य क्षेत्रातील गुंडेनूर, बंगाडी, गोपणार ही महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गावे असून गावकऱ्यांना पोलिसांनी दिवाळी साजरी करण्यासाठी आमंत्रित केले होते. दिवाळी मालिकेतील कोयर या गावासोबत पोलीस ठाण्याच्या आवाराता दिवाळी साजरी केली. त्याअंतर्गत आदिवासी बांधवाना जीवनोपयोगी वस्तू, मुलांना शालेय साहित्य वाटप केले. यावेळी सर्वांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.

हेही वाचा - गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने अतिदुर्गम भागातील 140 बेरोजगार युवक झाले सुरक्षा रक्षक

हेही वाचा - गडचिरोलीत माओवाद्यांचा बंद : माओवाद्यांनी रस्त्यावर झाडे तोडून बस अडवली

Last Updated : Nov 30, 2020, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.