गडचिरोली - नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग आढळून आल्याने मोठा अनर्थ टळला. एटापल्ली तालुक्यातील उपविभाग पेंढरी अंतर्गत येत असलेल्या पेंढरी जंगल परिसरात सी - ६० कमांडो आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलविरोधी अभियान राबवत होते. घटनास्थळवरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - उमेदवारी न मिळणं अनपेक्षीत, आत्मपरिक्षण करणार - विनोद तावडे
पेंढरी जंगल परिसरातील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने भूसुरुंगासाठी साहित्य जमिनीत पुरून ठेवले आहे, अशी माहिती नक्षलविरोधी अभियान राबवत असताना सी-६० कमांडो जवानांना मिळाली होती. माहितीवरून शुक्रवारी सायंकाळी शोध अभियान राबवित असताना १४ नग २ इंच मोटार सेल, १४ हँड ग्रेनेड, १५ किलो जिलेटीन, ५ ते ७ किलो जिवंत स्फोटक असलेला प्रेशर कुकर डिटोनेटरसह, १ कुकर बाँच आयईडीसह, वायर बंडल, नक्षली गणवेष (डांगरी), लाल व पांढऱ्या रंगाचे कापडी नक्षल बॅनर, आरसीआयडी खीच, विदयुत साहीत्य, पँकीग साहीत्य व नक्षली लिखित साहीत्य अशा मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले.
हेही वाचा - पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक
नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलीस दलाला उधळून लावण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाला मिळालेले हे मोठे यश आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या यशस्वी कामगिरी करणाऱ्या सी-६० कमांडोंचे अभिनंदन केले.