ETV Bharat / state

CORONA : आवश्यकता असेल तरच बाहेर पडा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गरज पडल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. याठिकाणी आता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४ तास तैनाती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुढचे दोन आठवडे प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

आवश्यकता असेल तरच बाहेर पडा
आवश्यकता असेल तरच बाहेर पडा
author img

By

Published : Mar 19, 2020, 12:31 PM IST

Updated : Mar 19, 2020, 12:47 PM IST

गडचिरोली - कोरोना प्रतिबंधासाठी पुढची दोन आठवडे अतिशय महत्वपूर्ण आहेत. आवश्यकता असेल तरच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती द्यावी. अन्यथा परस्परांपासून अलिप्त घरातच राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे नागिराकांना आवाहन

३१ तारखेपर्यंत नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गरज पडल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. याठिकाणी आता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची २४ तास तैनाती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुढचे दोन आठवडे प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

हेही वाचा - विदेशातून परतणारे 21 जण लोकसंपर्कापासून दूर; प्रशासनाचा खबरदारीचा उपाय

संपूर्ण देशात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. या परिस्थितीत जवळपास सर्व शासकीय, शैक्षणिक खासगी संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत. यामागे नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी असून याला सुटी न समजता कुठेही न फिरता घरीच राहणे आवश्यक आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असून या काळात सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा - रताळे उत्पादनासाठी 'हे' गाव प्रसिद्ध, मात्र दराअभावी शेतकरी हतबल

Last Updated : Mar 19, 2020, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.