ETV Bharat / state

गडचिरोलीतल्या 'त्या' चार गावात ४५.०५ टक्के मतदान - april

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील  अतिदुर्गम असलेल्या एटापल्ली तालुक्यातील वाटेली, गरदेवाडा, पुष्पोटी, वांगेपुरी येथे आज ४५.०५ टक्के मतदान झाले.

गडचिरोलीतील 'त्या' चार गावांमध्ये आज मतदान
author img

By

Published : Apr 15, 2019, 8:18 AM IST

Updated : Apr 15, 2019, 5:21 PM IST

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील अतिदुर्गम असलेल्या एटापल्ली तालुक्यातील वाटेली, गरदेवाडा, पुष्पोटी, वांगेपुरी येथे आज ४५.०५ टक्के मतदान झाले. सुरक्षेच्या कारणामुळे या चारही गावात ११ एप्रिल रोजी मतदान झाले नाही. त्यामुळे येथे आज १५ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.

या चारही गावात १ हजार ३९८ पुरुष व १ हजार २८८ महिला, असे २ हजार ६८६ मतदार होते. त्यापैकी ७८९ पुरुष तर ४२१ महिला, अशा १ हजार २१० मतदारांनी मतदान केले. चारही गावासाठी रूम नं 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा येथे मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. कोणतीही अनुचित किंवा नक्षल घटना घडू नये, यासाठी येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ ४५.०५ टक्के मतदान झाले.

गडचिरोलीतील 'त्या' चार गावांमध्ये आज मतदान

मतदान काळात एटापल्ली तालुक्यातील कसनसूर जवळील मौजा वागेझरीजवळ आईडी स्फोट झाला. एवढेच नाही तर गट्टा जांबीया आणि पुरसलगोंदी गावाजवळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात २ जवान जखमी झाले होते. त्यामुळे या ४ गावांत आज मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. चारही गावांचे मतदान गट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत होणार आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात यापूर्वी ११ एप्रिलला झालेल्या मतदानात ७२.०२ टक्के मतदान झाले. यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ७२.८८ टक्के, आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७३.८० टक्के, अहेरी विधानसभा क्षेत्रात ६७.२५ टक्के, आमगाव विधानसभा क्षेत्रात ६८.६८ टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ७५.२६ टक्के, तर चिमूर विधानसभा क्षेत्रात ७३.५९ टक्के मतदान झाले आहे.

वाटेलीचे मतदान रूम नं 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, गरदेवाडाचे मतदान रूम नं 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, पुस्कोटीचे मतदान रूम नं 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, वांगेतुरीचे मतदान रूम नं 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गट्टा येथे घेण्यात आले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 15, 2019, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.