ETV Bharat / state

22 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण - गडचिरोली नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्‍या चार जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला नक्षलीचा समावेश आहे.

गडचिरोली
गडचिरोली
author img

By

Published : Mar 23, 2021, 3:09 PM IST

गडचिरोली - शासनाकडून 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्‍या चार जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला नक्षलीचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या चारही नक्षलवाद्यांवर खून, जाळपोळ, चकमकी असे विविध गुन्हे दाखल होते, अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गडचिरोली
  1. दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम हा २८ वर्ष वयाचा जहाल माओवादी डिसेंबर २००६ मध्ये टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती होऊन फेब्रुवारी २००७ पासून टिपागड तसेच चातगाव दलममध्ये कार्यरत होता. मार्च २००७ च्या शेवटी प्लाटून क्रमांक ०३ मधून बदली होऊन भामरागड दलममध्ये कार्यरत होता. सन २०१० ला एसीएम पदावर भामरागड दलममध्ये पदोन्नती झाली. सप्टेंबर २०२१ ला दलम कमांडर म्हणून पदोन्नती दिली व डिसेंबर २०१८ पर्यंत कमांडर पदावर कार्यरत होता. फेब्रुवारी २०१९ ला प्लाटुन क्रमांक ०७ ची स्थापना करून प्लाटुन क्रमांक ०७ चे कमांडर बनला. आक्टोबर २०२० पर्यंत भामरागड एरिया कमांडर पदावर कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे ११ गुन्हे, खुनाचे ०६ गुन्हे, जाळपोळीचे ०३ गुन्हे दाखल असून शासनाने त्याचेवर एकूण ०८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
  2. नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी हा ३५ वर्ष वयाचा माओवादी सप्टेंबर २००२ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती होऊन नोव्हेंबर २००३ मध्ये टिपागड दलममधून बदलून प्लाटुन क्र. ०३ मध्ये कार्यरत होता. सन २००६ मध्ये प्लाटुन क्र. ०३ चा सेक्शन क.०१ चा उपकमांडर तर सन २००८ मध्ये प्लाटुन क्र. ०३ चा सेक्शन कमांडर म्हणून कार्यरत होता. एप्रिल २००७ मध्ये नक्षल सदस्या निला कुमरे हिचेसोबत लग्न केले. त्याच्यावर चकमकीचे ०९ गुन्हे, ०४ खुनाचे, जाळपोळीचे ०५ गुन्हे, ०१ भूसुरुंग स्फोटाचे गुन्हे दाखल असून शासनाने ०८ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
  3. निला रुषी कुमरे ही ३४ वर्ष वयाचा माओवादी असुन ती नोव्हेंबर २००५ ला कसनसूर दलम मध्ये सीएनएमएम टिममध्ये सदस्या पदावर भरती होवुन सन २००७ मध्ये नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी प्लाटुन क्र.०३ सेक्शन क्र. ०१ चा कमांडर याचेसोबत लग्न केले. ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. तिचेवर चकमकीचे ०३ गुन्हे, ०३ खुनाचे, जाळपोळीचे ०४ गुन्हे दाखल असुन, तिच्यावर शासनाने ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
  4. शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला हा २६ वर्ष वयाचा माओवादी जानेवारी २०११ ला चातगाव दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती होऊन माहे सप्टेंबर २०१९ ला पीपीसीएम पदावर पदोन्नती होवून माहे नोव्हेंबर २०२० पर्यंत झोन टिडीला पीपीसीएम पदावर आजपावेतो कार्यरत. त्याचेवर चकमकीचे ०६ गुन्हे, ०२ खुनाचे गुन्हे दाखल असुन, त्याचेवर शासनाने ०४ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

    2019 पासून 37 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण-

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९-२१ या वर्षांत आजपर्यंत ३७ माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यात ०४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०२ दलम उपकमांडर, २८ सदस्य,०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.