गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (वय ३७) यांची हत्या झाली. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळी झाडून तलांडी यांची हत्या केली. रामा तलांडी हे बुर्गी ग्रामपंचायतमध्ये १० वर्ष उपसरपंच होते.
बुर्गी येथे एका लग्न समारंभात डीजे लावत असताना साध्या वेशात आलेल्या नक्षलवाद्यांनी रामा तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या व नक्षलवादी जंगलात पसार झाले. यात रामा तलांडी यांचा जागेवरच मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी बुर्गी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यावेळी रामा तलांडी यांनी फडणवीस यांना रस्ते व मोबाईल टॉवरची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा - बिजापूरमधील चकमकीनंतर सुरक्षा दलाचे 21 जवान बेपत्ता; सीआरपीएफच्या सात जणांचा समावेश