ETV Bharat / state

अतिदुर्गम भागात एकनाथ शिंदेंनी पोलिसांसोबत साजरा केले रक्षाबंधन - एकनाथ शिंदेंनी साजरा केले रक्षाबंधन

नक्षली कारवाईचा धोका पत्कारून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दलही एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 22, 2021, 3:09 PM IST

Updated : Aug 22, 2021, 3:19 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील नक्षली कारवाईचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस आउटपोस्ट. या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांंनी भेट दिली. यावेळी पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटुंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण मंत्री शिंदे यांनी साजरा केला. यावेळी नक्षली कारवाईचा धोका पत्कारून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दलही एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदेंनी पोलिसांसोबत साजरा केले रक्षाबंधन

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सांगला आणि सर्व पोलीस बांधव त्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा - गायीच्या शेणापासून इकोफ्रेंडली राखी; गोंदियातील महिलेच्या उपक्रमाला इतर राज्यातही मागणी

Last Updated : Aug 22, 2021, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.