ETV Bharat / state

गडचिरोली लोकसभा मतदार संघात १ हजार ८७१ केंद्रावर होणार मतदान - voting

मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय इतर १० ओळखपत्रांचा आधार घेता येईल. यावेळी प्रथमच मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे कुणाला मतदान दिले, हे मतदाराला समजणार आहे. जिल्ह्यात २ हजार दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान केंद्रावर सोयीस्कररित्या पोहोचता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

गडचिरोली
author img

By

Published : Mar 12, 2019, 11:46 AM IST

गडचिरोली - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात १ हजार ८७१ केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

गडचिरोली

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंग म्हणाले, की देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ७ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होईल. १८ मार्चला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. १८, १९, २० तसेच २२ व २५ मार्चला नामनिर्देशन पत्र भरता येणार आहे. त्यानंतर २६ मार्चला दाखल नामांकनाची छाननी होणार आहे. २८ मार्चला अर्ज मागे घेता येतील, तर ११ एप्रिलला मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय इतर १० ओळखपत्रांचा आधार घेता येईल. यावेळी प्रथमच मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे कुणाला मतदान दिले, हे मतदाराला समजणार आहे. जिल्ह्यात २ हजार दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान केंद्रावर सोयीस्कररित्या पोहोचता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी त्यांना ग्रामपंचायत मार्फत मागणी करावी लागणार आहे. गर्भवती महिला, वयोवृद्ध यांना रांगेत राहण्याची गरज राहणार नाही, अशी व्यवस्था आगामी निवडणुकीत करण्यात आली आहे. यापूर्वी बॅलेटपेपरमध्ये उमेदवाराचे नाव व त्याचे चिन्ह असायचे. मात्र, यावेळी नाव व चिन्हासह उमेदवाराचा फोटोही राहणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात १५ लाख ६८ हजार ६२० मतदार असून यामध्ये ७ लाख ९४ हजार ४६८ पुरुष तर ७ लाख ७३ हजार ८५० महिला मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७ लाख २८ हजार ११६ मतदार होते. आगामी निवडणुकीत ३१ जानेवारी २०१९ पर्यंत ७ लाख ६९ हजार ७४० मतदारांची नोंदणी झाली आहे. जवळपास ३३ हजार मतदार वाढले असून मतदानाची टक्केवारीही वाढणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात यावर्षी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राचा आकडा घोषित न करता त्यात ३३ संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र यावर्षी कमी झाल्याचे सांगितले. या वर्षी एकूण मतदान केंद्रामध्ये ८० मतदान केंद्र वाढली असून १ हजार ८७१ मतदान केंद्रामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात २८१ तर शहरी भागात १ हजार ५९० मतदान केंद्राचा समावेश आहे. यावर्षीची निवडणूक दारूमुक्त करण्यावर जिल्हा पोलीस प्रशासनाचा भर आहे. यासाठी मुक्तीपथ अभियानाची मदत घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील जिल्हा असल्याने मतदान किती वाजेपर्यंत राहील, याबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून निश्चित झालेले नाही. मात्र, तरिही सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत मतदान होईल, याबाबत लवकरच कळवले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:1 हजार 871 मतदान केंद्रावरून होणार गडचिरोली जिल्ह्यात मतदान

गडचिरोली : सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून खलबते सुरू झाली असून जिल्हा प्रशासनाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार क्षेत्रात 1 हजार 871 मतदान केंद्रावर मतदान होणार असून तब्बल 7 लाख 69 हजार 746 मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. Body:पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर नान्हे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ उपस्थित होते. माहिती देताना जिल्हाधिकारी सिंग म्हणाले, देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तर महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार असून 18 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. 18, 19, 20 तसेच 22 व 25 मार्च रोजी नामनिर्देशन पत्र भरता येणार आहे. त्यानंतर 26 मार्च रोजी दाखल नामांकनाची छाननी होणार आहे. 28 मार्च रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 11 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय इतर दहा ओळखपत्रांचा आधार घेता येईल, यावेळी प्रथमच व्ही व्ही प्याड यंत्र मतदान यंत्राला बसविण्यात आले असून कुणाला मतदान दिले, हे मतदाराला समजणार आहे. जिल्ह्यात दोन हजार दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान केंद्रावर सोयीस्कर रित्या पोहोचता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र यासाठी त्यांना ग्रामपंचायत मार्फत मागणी करावी लागणार आहे. गर्भवती महिला, वयोवृद्ध यांना रांगेत राहण्याची गरज राहणार नाही, अशी व्यवस्था आगामी निवडणुकीत करण्यात आली आहे. यापूर्वी बँलेट पेपर मध्ये उमेदवाराचे नाव व त्याचे चिन्ह असायचे. मात्र यावेळेस नाव व चिन्हासह उमेदवाराचा फोटोही राहणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात 15 लाख 68 हजार 620 मतदार असून यामध्ये 7 लाख 94 हजार 468 पुरुष तर 7 लाख 73 हजार 850 महिला मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 7 लाख 28 हजार 116 मतदार होते. आगामी निवडणुकीत 31 जानेवारी 2019 पर्यंत 7 लाख 69 हजार 740 मतदारांची नोंदणी झाली आहे. जवळपास 33 हजार मतदार वाढले असून मतदानाची टक्केवारीही वाढणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

तर माहिती देतांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात यावर्षी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राचा आकडा घोषित न करता त्यात 33 संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र यावर्षी कमी झाल्याचे सांगितले. या वर्षी एकूण मतदान केंद्रांमध्ये 80 मतदान केंद्र वाढले असून 1 हजार 871 मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात 281 तर शहरी भागात 1590 मतदान केंद्राचा समावेश आहे. यावर्षीची निवडणूक दारूमुक्त निवडणूक करण्यावर जिल्हा पोलिस प्रशासनाचा भर असून यासाठी मुक्तीपथ अभियानाची मदत घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे सगळ्यांना अवगत करण्यात आले असून सर्व पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा करण्यात आले आहेत, असे सांगितले.

गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील जिल्हा असल्याने मतदान किती वाजेपर्यंत राहील, याबाबत अद्याप निवडणूक आयोगाकडून निश्चित झाले नसले तरी सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत मतदान होईल, याबाबत लवकरच कळवले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.