गडचिरोली - येथील नक्षलवादी हल्ला दुर्दैवी असून नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे डीजीपी जैस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच, या घटनेनंतर आमचे मनोबल खच्ची झाले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथे बुधवारी केलेल्या भूसुरुंग हल्ल्यात १६ जवानांना वीरमरण आले होते. यानंतर, आज या सर्व वीर जवानांना गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली.
डीजीपी यांची पत्रकार परिषद -
- नक्षल्यांचा बुधवारी झालेला हल्ला हा दुर्देवी
- या घटनेने आम्ही खच्ची झालो नाहीत
- नक्षलवाद्यांना चोख उत्तर देले जाईल
- खासगी गाडीच्या चालकालाही शहिदाचा दर्जा
- शासनाकडून चालकाच्या परिवाराला मदत दिली जाईल