गडचिरोली - जिल्हातील नागरिक शनिवारपर्यंत कोरोनामुक्त जिल्हा म्हणून शांत बसले होते. मात्र, शनिवारपासून कोरोना पाझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे नक्षलवादी कारवाया अशा दहशतीत येथील नागरिक दिवस काढत आहेत. नक्षलवाद्यांनी रेपनपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर गावातील सीसीटीव्ही कमेऱ्यांची तोडफोड केली आणि चौकात बॅनर बांधून २२ मे रोजी जिल्हाबंदचे आवाहन केले. त्यामुळे कमलापूर नागरिकांमध्ये परिसरात दहशत पसरली आहे.
सीनभट्टी जंगलात 2 मे रोजी नक्षल आणी नक्षलविरोधी अभियान पथकामध्ये चकमक उडाली. या चकमकीत महिला नक्षली स्रुजनक्का ऊर्फ चिन्नक्का आर्क मारली गेली. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी बॅनर लावून 20 मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले. त्याच रात्री गडचिरोली छत्तीसगड सीमेवरवरून येणाऱ्या कंत्राटदार वाहनांची सावरगाव गाजीमेंढाजवळ जाळपोळ केली होती.