ETV Bharat / state

किष्टापूर नाल्यावर पुलाची उभारणी; पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटणाऱ्या 25 गावांचा प्रश्न मिटला - अहेरी पुलाची उभारणी

अहेरी तालुका मुख्यालयापासून तब्बल 60 किलोमीटर अंतरावर किष्टापूर नाला आहे. या नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात पूर येताच पलीकडील 25 गावांचा पूर्ण संपर्क तुटून दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बंद पडते. या 25 गावातील नागरिक जीपने नाल्यापर्यंत येतात.

bridge at Kishtapur Canal
किष्टापूर नाल्यावर पुलाची उभारणी; पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटणाऱ्या 25 गावांचा प्रश्न मिटला
author img

By

Published : Jul 8, 2020, 1:54 PM IST

गडचिरोली - जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्यावर पुल नसल्याने पलीकडच्या गावांचा पावसाळ्यामध्ये चार महिने जगाशी संपर्क तुटलेला असायचा. नागरिकांच्या सततच्या मागणीने वर्षभरात 4 कोटी 60 लाख रुपये खर्च करून येथे नवीन पुलाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. यामुळे 25 गावातील आदिवासी नागरिकांच्या जीवनात विकासाची नवी पहाट येणार आहे.

अहेरी तालुका मुख्यालयापासून तब्बल 60 किलोमीटर अंतरावर किष्टापूर नाला आहे. या नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात पूर येताच पलीकडील 25 गावांचा पूर्ण संपर्क तुटून दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बंद पडते. या 25 गावातील नागरिक जीपने नाल्यापर्यंत येतात. नंतर मात्र हातात असलेले सामान खांद्यावर घेऊन पाण्यातून जीव धोक्यात घालत हा नाला पार करतात. मोटार सायकलने नाल्यापर्यंत आलेल्यांना नाल्याच्या पलीकडे मोटरसायकल नेण्यासाठी कसरत करावी लागते. चार जण एका लाकडावर मोटर सायकल ठेऊन नाला पार करतात.

bridge at Kishtapur Canal
किष्टापूर नाल्यावर पुलाची उभारणी

ही अवस्था उपचाराकरिता अहेरी किंवा गडचिरोली येथील रुग्णालयात जाण्याकरिताही सहन करावी लागत होती. अशावेळी रुग्णाचा जीवही जात होता. तर बाजारपेठ तसेच खरेदीला जाण्यासाठी याच संकटाला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेतल्यावर पुलाला मंजुरी मिळून वर्षभरात पुलाचे बांधकाम पुर्ण झाल्याने यावर्षी 25 गावांचा संपर्क तुटणार नाही. ही गावे पुलामुळे जोडली गेली असल्याने सरकारी योजनांसह चार महीने गावापासून दुर राहणारी सरकारी यंत्णार गावात पोहचणार आहे. पावसाळ्यात नाल्यातून जाण्यासाठी धडपडून जीव गमावणारे वाचतील. तसेच आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी नागरीकांचा प्रवास सुकर झाल्याने अनेकांचे जीव वाचणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.