ETV Bharat / state

गडचिरोलीत भरकटलेल्या हत्तीच्या हल्ल्यात वनरक्षक जखमी

भरकटलेल्या हत्तींचा शोध घेत असताना हत्तीने सोंडेत पकडून वनरक्षकाला गंभीर जखमी केले. कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात सोमवारी ही घटना घडली.

author img

By

Published : Jun 11, 2019, 10:58 PM IST

भरकटलले हत्ती

गडचिरोली - भरकटलेल्या हत्तींचा शोध घेत असताना हत्तीने सोंडेत पकडून वनरक्षकाला गंभीर जखमी केले. कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात सोमवारी ही घटना घडली. ज्ञानेश्वर चिल्लमवार असे जखमी वनरक्षकाचे नाव असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीमालगतच्या राज्यातून हत्ती कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात भटकत आल्याची माहिती आहे. या भरकटलेल्या हत्तींनी बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात दहशत माजविली आहे. त्यामुळे गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

या भरकटलेल्या हत्तींची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांस मिळाली होती. त्यानुसार जंगल परिसरात हत्तीचा शोध सुरू होता. अचानक हत्ती समोर आल्याने गोंधळ उडाला. भांबावलेला हत्ती वनरक्षकाच्या मागे धावत येवून ज्ञानेश्वर चिल्लमवार या वनरक्षकाला आपल्या सोंडमध्ये पकडून हवेत फेकले. यात वनरक्षक चिल्लमवार झाडाला जाऊन आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

चिल्लमवार यांच्या चेहऱयाला, कंबरेला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिल्लमवार यांचा पाय गुडघ्यापासून तुटल्याचीही माहिती मिळत आहे.

Intro:भटकलेल्या हत्तीने वनरक्षकाला उडविले

गडचिरोली : भटकलेल्या हत्तीचा शोध घेत असताना हत्तीने सोंडत पकडून वनरक्षकाला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात घडली. ज्ञानेश्वर चिलमवार असे वनरक्षकाचे नाव असून त्यांच्यावर सध्या गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.Body:भटकलेले हत्ती असल्याची माहिती बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकाºयास मिळाली असता संपूर्ण चमूसह जंगल परिसरात हत्तीचा शोध सुरू होता. मात्र अचानक  हत्ती वनरक्षकांना दिसला. त्यामुळे गोंधळ उडाला. तेवढ्यात दुसºया हत्ती वनरक्षकाच्या मागे धावत आला आणि ज्ञानेश्वर चिलमवार या वनरक्षकाला आपल्या सोंडमध्ये पकडून हवेत फेकले. यात वनरक्षक चिलमवार झाडाला जाऊन आदळल्याने वनरक्षक चिलमवार  यांना गंभीर दुखापत झालीे.

चिल्लमवार यांच्या चेहºयाला, कंबरेला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली आहे. चिलमवार  यांना  प्राथमिक उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर चिल्लमवार यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिल्लमवार यांचा पाय गुडघ्यापासून तुटल्याचीही माहिती आहे. 
सिमालगतच्या राज्यातून हत्ती कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात भटकत आल्याची माहिती आहे. या भटकलेल्या हत्तींनी बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कोचीनारा व सातपुती जंगल परिसरात दहशत माजविली आहे. त्यामुळे बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अद्यापही हत्तींना पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे.
Conclusion:सोबत फोटो आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.