ETV Bharat / state

अमरीश आत्रामांना मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'बाबत निष्क्रियता भोवली; आदिवासी, वन राज्यमंत्रीपदावरुन पायउतार - गडचिरोली

विदेशात शिक्षण घेतलेले अमरीश आत्राम हे उच्चशिक्षित असल्याने भाजपची सत्ता येतात त्यांना फडणवीस सरकारमध्ये आदिवासी व वन राज्यमंत्रीपद मिळाले. मात्र, गेल्या साडेचार वर्षात त्यांना पदाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

गडचिरोली
author img

By

Published : Jun 16, 2019, 5:14 PM IST

गडचिरोली - रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 नवीन चेहर्‍यांना संधी देत सहा मंत्र्यांना डच्चू दिला. यामध्ये राज्याचे आदिवासी, वन राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सूरजागड लोह प्रकल्पाबाबत निष्क्रियता व जनसंपर्काचा अभाव यामुळेच त्यांना राज्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

गडचिरोली

2014 च्या विधानसभा निवडणुकीत अमरीश आत्राम हे पहिल्यांदाच आमदार म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडून आले. यापूर्वी अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून दीपक आत्राम निवडून आले होते. कट्टर विदर्भवादी नेते सत्यवान आत्राम यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीची स्थापना करून या समितीमार्फत 2009 ला विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यांच्या निधनानंतर मोठा मुलगा अंबरीश आत्राम यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीची धुरा सांभाळली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजपकडून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.

विदेशात शिक्षण घेतलेले अमरीश आत्राम हे उच्चशिक्षित असल्याने भाजपची सत्ता येतात त्यांना फडणवीस सरकारमध्ये आदिवासी व वन राज्यमंत्रीपद मिळाले. मात्र, गेल्या साडेचार वर्षात त्यांना पदाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अधिवेशन काळात सतत गैरहजर राहत असल्याच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांचे मंत्रिपद कायम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून एटापल्ली तालुक्यात सूरजागड लोहा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होता. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांची समजूत काढून प्रकल्प सुरू केला.

मात्र, राज्याचे आदिवासी, वन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अंबरीश आत्राम यांनी एकदाही स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत गेला आणि सद्यस्थितीत हा प्रकल्प विविध कारणाने बंद पडला आहे. तर तेलंगणा सरकारकडून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा शहराच्या जवळील गोदावरी नदी काठावर मेटीगट्टा प्रकल्पचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पालाही नागरिकांचा मोठा विरोध असताना अमरीश आत्राम यांनी स्थानिकांच्या हितासाठी फारसे प्रयत्न केले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत गेला.

स्थानिकांना विश्वासात न घेणे, अनेक महत्वपूर्ण सभांना अनुपस्थित राहणे, पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमांना गैरहजेरी, जनसंपर्काचा अभाव अशा अनेक कारणांमुळे त्यांच्याकडील मंत्रिपद काढून घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना 65 हजार मते तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना 71 हजार मते मिळाली. विद्यमान आमदार भाजपचा असतानाही भाजपच्या उमेदवाराला सहा ते सात हजार कमी मते मिळाल्याने पक्षश्रेष्ठीही त्यांच्यावर नाराज होते, हे यावरून स्पष्ट होते.

Intro:अमरीश आत्राम यांना मुख्यमंत्र्यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'बाबत निष्क्रियता भोवली : आदिवासी, वन राज्यमंत्रीपदावरुन पायउतार

गडचिरोली : रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 नवीन चेहर्‍यांना संधी देत सहा मंत्र्यांना डच्चू दिला. यामध्ये राज्याचे आदिवासी, वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सुरजागड लोह प्रकल्पाबाबत निष्क्रियता व जनसंपर्काचा अभाव यामुळेच त्यांना राज्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.Body:2014 च्या विधानसभा निवडणुकीत अमरीश आत्राम हे पहिल्यांदाच आमदार म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडून आले. यापूर्वी अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून दीपक आत्राम निवडून आले होते. कट्टर विदर्भवादी नेते सत्यवान आत्राम यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीची स्थापना करून या समितीमार्फत 2009 ला विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या निधनानंतर मोठा मुलगा अंबरीश आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची धुरा सांभाळली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजपकडून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.

विदेशात शिक्षण घेतलेले अमरीश आत्राम हे उच्चशिक्षित असल्याने भाजपची सत्ता येतात त्यांना फडणवीस सरकारमध्ये आदिवासी व वने राज्यमंत्रीपद मिळाले. मात्र गेल्या साडेचार वर्षात त्यांना पदाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अधिवेशन काळात सतत गैरहजर राहत असल्याच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र त्यानंतरही त्यांचे मंत्रिपद कायम होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोहा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध होता. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांची समजूत काढून प्रकल्प सुरू केला.

मात्र राज्याचे आदिवासी, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अंबरीश आत्राम यांनी एकदाही स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत गेला आणि सद्यस्थितीत हा प्रकल्प विविध कारणाने बंद पडला आहे. तर तेलंगणा सरकारकडून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा शहराच्या जवळील गोदावरी नदी काठावर मेटीगट्टा प्रकल्पचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाणार आहे. या प्रकल्पालाही नागरिकांचा मोठा विरोध असताना अमरीश आत्राम यांनी स्थानिकांच्या हितासाठी फारसे प्रयत्न केले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत गेला.

स्थानिकांना विश्वासात न घेणे, अनेक महत्वपूर्ण सभांना अनुपस्थित राहणे, पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमांना गैरहजेरी, जनसंपर्काचा अभाव अशा अनेक कारणांमुळे त्यांच्याकडील मंत्रीपद काढून घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना 65 हजार मते तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना 71 हजार मते मिळाली. विद्यमान आमदार भाजपचा असतानाही भाजपच्या उमेदवाराला सहा ते सात हजार कमी मते मिळाल्याने पक्षश्रेष्ठीही त्यांच्यावर नाराज होते, हे यावरून स्पष्ट होते.
Conclusion:सोबत फोटो जोडलं आहे, PTC मोजोवरून MH_gad_PTC_7204540 अश्या slag ने पाठविले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.