गडचिरोली - केंद्र सरकारने सीएए कायदा आणला. या कायद्याला विरोध करीत दिल्ली येथे शाहीनबागच्या माध्यमातून बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ गडचिरोलीत जामा मस्जिद परिसरात प्रती शाईनबागची सुरुवात करण्यात आली आहे. 28 जानेवारी पासून येथे आंदोलन सुरू आहे.
केंद्र सरकारने आणलेला कायदा मुस्लीम विरोधी असून हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन सुरूच राहील, असा इशारा गडचिरोली येथील मुस्लीम भगिनींनी दिला आहे. रोज संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनाने त्वरित मुस्लीम बांधवांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडो मुस्लीम महिलांचा लहान मुलेही सहभागी झाले आहेत.
हेही वाचा - गडचिरोलीत वकीलांचे बेमुदत कामबंद आंदोलन; अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी