ETV Bharat / state

कोरोनामुळे काम आणि कमाई बंद मात्र दारू सुरू करण्यामागचं रहस्य काय? - डॉ. अभय बंग - Corona virus

दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही, ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील, असे डॉ. अभय बंग यांनी सांगितले आहे.

Abhay Bang
डॉ. अभय बंग
author img

By

Published : May 4, 2020, 5:03 PM IST

गडचिरोली - भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी अतिशय स्तुत्य पावले आतापर्यंत उचलली आहेत. पण, रविवारी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपत असताना देशातील रेड झोन मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणी दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा असल्याची प्रतिक्रिया देत काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे सरकारचे रहस्य काय? असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग

कोरोनामुळे आजच्या तारखेपर्यंत भारतात 42 हजारावर लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 1300 च्या वर मृत्यू झाले आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण, त्याचवेळी भारतात दर वर्षी दारूमुळे 5 लक्ष मृत्यू होतात. भारतातील 5 कोटी लोक दारूच्या व्यसनाने ग्रासित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. म्हणजे कोरोना संसर्गाने होणार्‍या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहेत. कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल असल्याचे डॉ. बंग म्हणाले.

दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही, ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील. त्यामुळे लोकांना घरपोच कोरोना पोहोचविण्याची योजना असावी, असे स्वरूप शासनाच्या या निर्णयामुळे निर्माण होईल असे डॉ. बंग म्हणाले.

कोरोनामुळे शासनाने महिनाभरापासून दारू, खर्रा व तंबाखूवर बंदी घातली होती. त्याचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती, तर लोकांना आणखी फायदा झाला असता. पण, दुर्दैव असे की दारुमुळे मार खाणारी जनता बोलत नाही. ती उलट दारूच्या दुकानसमोर रांग लावते. जनतेचे हित आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतु आहे, तर अशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याचे डॉ. बंग म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.