गडचिरोली- पोरला येथील गाव संघटनेच्या सदस्यांनी तब्बल १० पोती अवैध मोहसडवा नष्ट केला आहे. हा मोहसडवा परिसरातील एका शेतात प्लास्टिक पोत्यांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या कारवाईनंतर शहरातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोरला येथे गाव संघटनेच्या प्रयत्नाने दारूविक्रीवर बंदी आहे. पण चोरून लपून गावात दारूविक्री होते. गावातीलच एका शेतात गवतांमध्ये मोहसडवा लपविला जात असल्याची माहिती गाव संघटनेला मिळाली. त्यांनी मुक्तिपथ तालुका चमूला याची माहिती दिली. तालुका चमूने बैठक घेऊन शोधमोहीम सुरू केली असता, एका शेतात वाढलेल्या उंच गवतात प्लास्टिकच्या १० पोत्यांमध्ये भरून ठेवण्यात आलेला मोहसडवा आढळला. हा संपूर्ण सडवा गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नष्ट केला. दारूचे ड्रम जमिनीखाली पुरून ठेवण्यात बरीच मेहनत जाते व सापडल्यास नुकसानही होते. त्यामुळे आता विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या मोठमोठ्या पिशव्यांमध्ये सडवा टाकणे सुरू केले आहे.
हेही वाचा- जिलानी बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्यात पाच राज्यातील हजारो भाविकांची गर्दी