ETV Bharat / state

नाशिक एटीएम लूट प्रकरणाचे धुळे कनेक्शन; तपासादरम्यान घरात सापडले वन्यप्राण्यांचे अवशेष - प्राणी तस्करीचे रॅकेट धुळे

घरात वन्यप्राण्यांचे अवशेष, धारधार तलवार, कटवणी यासारखी हत्यारे आढळून आली. तर घरात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम देखील आढळून आली. पोलिसांनी तत्काळ वनविभागाला माहिती देत पाचारण केले. वनविभागाने मृत प्राण्यांचे अवशेष ताब्यात घेत संबंधितांवर वन्यजीव सरंक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

धुळे : वन्यप्राण्यांचे अवशेषासह घरात आढळले हत्यार
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:34 PM IST

धुळे - वन्यप्राण्यांच्या अवशेषासह धारदार शस्त्र आणि सोन्या चांदीचे दागिने घरात झडती दरम्यान आढळून आल्याने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथे एटीएम लुटीच्या गुन्ह्यात धुळ्यातील मोहाडी येथील मिलनसिंग भादा याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी सदर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांना शासकीय कामात अडथळा आणून धमकावल्याप्रकरणी भादा परिवारातील दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा - धुळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविण्यात यश

मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनी परिसरात राहणार मिलनसिंग भादा याच्या घरात धारधार शस्त्र असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने वनश्री कॉलनीत मिलनसिंग याच्या घरावर छापा टाकत झाडाझडती घेतली. यावेळी घरात वन्यप्राण्यांचे अवशेष, धारधार तलवार, कटवणी यासारखी हत्यारे आढळून आली. तर घरात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम देखील आढळून आली. पोलिसांनी तात्काळ वनविभागाला माहिती देत पाचारण केले. वनविभागाने मृत प्राण्यांचे अवशेष ताब्यात घेत संबंधितांवर वन्यजीव सरंक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती दिली. मोहाडी पोलिसात संशयितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

झाडाझडती दरम्यान पोलिसांना अटकाव -

संशयित मिलनसिंग भादा याच्या घरी मोहाडी पोलीस झाडाझडतीसाठी गेले असता त्याठिकाणी भादा परिवारातील सदस्यांनी कारवाईवर आक्षेप घेत शासकीय आमच्या अडथळा आणला. पोलिसांनी त्यांची समजूत घालत सहकार्य करण्याची विनंती केली असता घरातील गॅस सिलेंडरने पेटवून घेत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी मोनिका पाटील यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राणी तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता -

मोहाडी उपनगर येथील रहिवासी मिलनसिंग भादा याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, घरात वन्यप्राण्यांचे मिळालेल्या अवशेषांवरून प्राणी तस्करीबाबत मोठा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोहाडी लगतच लळींग कुराण असून याठिकाणी आजही वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मोठमोठाल्या शहरात जनावरांचे मांस व कातडी तस्करीचे प्रकरण समोर येत आहे. याप्रकरणाचा सूत्रधार मिलनसिंग असल्याची शंका व्यक्त होत आहे. वनविभाग प्रशासनासह पोलीस प्रशासनाने याचा खोलवर तपास करत प्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी वन्यप्राणी समर्थक करत आहेत.

Intro:वन्यप्राण्यांचे अवशेषासह धारधार शस्त्र व सोन्याचांदीचे दागिने घरात झाडाझडती दरम्यान आढळून आल्याने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथे एटीएम लुटीच्या गुन्ह्यात धुळ्यातील मोहाडी येथील मिलनसिंग भादा याचा सहभाग असल्याचे समोर आले असून याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी सदर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाईदरम्यान पोलिसांना शासकीय कामात अडथळा आणून धमकावल्याप्रकरणी भादा परिवारातील दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. Body:मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनी परिसरात राहणार मिलनसिंग भादा याच्या घरात धारधार शस्त्र असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने वनश्री कॉलनीत मिलनसिंग भादा याच्या घरावर छापा टाकत झाडाझडती घेतली. यावेळी घरात वन्यप्राण्यांचे अवशेष, धारधार तलवार, कटवणी यासारखे हत्यार आढळून आले. तर घरात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम देखील आढळून आली. पोलिसांनी तात्काळ वनविभागाला माहिती देत पाचारण केले. वनविभागाने सदर मृत प्राण्यांचे अवशेष ताब्यात घेत संबंधितांवर वन्यजीव सरंक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांना दिली. तर मोहाडी पोलिसात संशयितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

झाडाझडती दरम्यान पोलिसांना अटकाव.... 
संशयित मिलनसिंग भादा याच्या घरी मोहाडी पोलिस झाडाझडतीसाठी गेले असता त्याठिकाणी भादा परिवारातील सदस्यांनी कारवाईवर आक्षेप घेत शासकीय आमच्या अडथळा आणला. पोलिसांनी त्यांची समजूत घालत सहकार्य करण्याची विनंती केली असता घरातील गॅस सिलेंडरने पेटवून घेत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी महिला पोलिस कर्मचारी मोनिका पाटील यांच्या तक्रारीवरीन मोहाडी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Conclusion:प्राणी तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता..... 
मोहाडी उपनगर येथील रहिवासी मिलनसिंग भादा याच्यावर यापूर्वी अनेकी गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिस दप्तरी दाखल आहेत. मात्र घरात वन्यप्राण्यांचे मिळालेल्या अवशेषांवरून प्राणी तस्करीबाबत मोठा गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोहाडी लगतच लळींग कुराण असून याठिकाणी आजही वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मोठमोठाल्या शहरात जनावरांचे मांस व कातडी तस्करीचे प्रकरण समोर येत असून याप्रकरणात सूत्रधार  मिलनसिंग तर नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. वनविभाग प्रशासनासह पोलिस प्रशासनाने याचा खोलवर तपास करत प्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी वन्यप्राणी समर्थक करत आहेत. 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.