ETV Bharat / state

धुळ्यात गोडाऊनला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू - धुळे आग बातमी

धुळे शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल सम्राट समोर शनिमंदिराच्या पाठीमागे असलेल्या बारदानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे.

spot
घटनास्थळ
author img

By

Published : Mar 9, 2021, 4:47 PM IST

Updated : Mar 9, 2021, 5:22 PM IST

धुळे - शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल सम्राट समोर शनिमंदिराच्या पाठीमागे असलेल्या बारदानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे.

माहिती देताना माजी नगरसेव

आज (दि. 9 मार्च) सकाळी 9 वाजेच्या सुमारास जयंत बाळकृष्ण पाखले हे आपल्या बारदानच्या कारखान्यात नेहमी प्रमाणे आले. त्यांनी देवपूजा करत अगरबत्ती लावली त्या अगरबत्तीची ठिणगी पडून ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गोडाऊनमध्ये चार जण होते. त्यापैकी दोघे आग लागल्यानंतर बाहेर पाडण्यात यशस्वी झाले तर जयंत पाखले आणि अरुण पाटील हा कामगार आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने आतच राहिले. पण, गोडाऊनमधून बाहेर येण्याचा एकच मार्ग होता. त्यावरही जळते बारदानचे गठ्ठे पडल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा आगीत भाजल्याने आणि धुरात गुदमरून मृत्यू झाला आहे. धुळे शहर पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे पथकही आले त्यांनी आग आटोक्यात आणली.

हेही वाचा - धुळे : पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

हेही वाचा - इंधन दरवाढ : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने चूल आणि गौऱ्याची विक्री करत अनोखे आंदोलन

Last Updated : Mar 9, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.