धुळे : माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे तापी नदीच्या पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने (Driver lost control of truck) ट्रक पाण्याने तुडूंब भरलेल्या नदीच्या पात्रात (truck fell into Tapi river) कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक मरण (truck driver died in accident) पावला. मात्र, अल्पवयीन सहचालक दैव बलवत्तर होते म्हणून मासेमाऱ्यांच्या सहकार्याने बचावला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील सावळदे पुलावर (Dhule Salwade bridge Truck accident) घडली. या घटनेला २४ तासांचा अवधी उलटून देखील नदीत कोसळला ट्रक बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. (Truck Accident Dhule), Dhule Crime, Latest news from Dhule
मासेमारी करणाऱ्या बांधवांमुळे 'तो' वाचला: पुणे येथून इंदोर कडे फ्रुड पावडर घेऊन जाणारा ट्रक बुधवारी सकाळी साधारण आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील तापी नदीवर असलेल्या सावळदे गावाजवळील पुलाजवळ आला. काहींच्या मते ओव्हर टेक करण्याच्या नादात तर काहींच्या मते ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक ७० ते ८० फूट उंचीवरून जवळपास ५० फूट खोल पाणी असलेल्या तापी नदीत कोसळला . यावेळी ट्रकमध्ये झोपेत असलेला अल्पवयीन सहचालक दिलीप ब्राम्हणे याला ट्रक नदीत कोसळत असताना मोठा आवाज झाल्याने जाग आली. त्याने कसलाही विचार न करता झोपेच्या धुंदीत चक्क नदीत उडी मारली. याचवेळी या ठिकाणापासून जवळच काही मासेमारी करणाऱ्या बांधवांना मोठा आवाज झाल्याचे ऐकून जाग आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दिलीप ब्राम्हणे याला नदीतून बाहेर काढले.
सहचालक रुग्णालयात दाखल - त्याच्यावर सध्या शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्यादेखत प्रसंग घडला असल्याने तो प्रचंड घाबरलेला आहे. मात्र त्याचा २६ वर्षीय सहकारी मुख्य चालक धर्मेंद्र मोहन डावळ (रा. निम सांगवी, तालुका जुलवानिया, जिल्हा बडवानी, मध्यप्रदेश) याचा मृतदेह पट्टीच्या पोहणाऱ्यांना गुरुवारी दुपारी उशिरा सापडला.
यापूर्वीही ट्रक कोसळल्याच्या घटना घडल्या- या घटनेला २४ तासांचा अवधी उलटून देखील नदीत कोसळला ट्रक बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या अगोदर देखील या पुलावरून ट्रक नदीत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत . अर्थात त्यास त्या वाहनांचे तांत्रिक कारण, चालकाचे नियंत्रण सुटणे हीच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.