धुळे - धुळ्यात पहाटे मार्निंग वॉकला फिरणाऱ्या व्यापाऱ्यासोबत चेन स्नाचिंगची घटना घडली ( Chain snatching gang in Dhule ) आहे. एका गुळ व्यापाऱ्याची सात तोळ्याची चेन दुचाकीस्वरांनी लंपास केली आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हि घटना घडली आहे. यामुळे पायी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आहे.
सात तोळ्याची चेन हिसकावून चोरटे फरार -
धुळे शहरातील गुळाचे व्यापारी ललित मोतीराम लोधा हे नेहमीप्रमाणे पांजरा नदी किनारी असलेल्या शिवाजी रोडवर पहाटे मॉर्निंग वॉकला फिरायला जातात. आज देखील नेहमीप्रमाणे ते फिरत होते. स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे लहान पुलाजवळ आल्यावर गाडीवरुन आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. सात तोळ्याची चेन हिसकावून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यांना पकडून विरोध केला. दुचाकीस्वारांनी त्यांना ढकलून देत तेथून पळ काढला. लोंढा यांना हाताला आणि पायाला जखम झाली असून यावेळी त्यांची एकच गर्दी झाली होती.
नागरिकांमध्ये दहशत -
दुचाकीस्वारांनी तोंडाला रुमाल बांधला होता तर पाठीमागे बसलेल्या दुसऱ्याने मास्क घातले होते. काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला मात्र पुढे त्यांचा मार्ग सापडू शकला नाही. व्यापाराची सात तोळ्याची चेन लुटल्याची माहिती परिसरात पसरल्याने खळबळ उडाली. माहिती पडता याठिकाणी यांची गर्दी झाली होती. तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळावर येत व्यापाराची विचारपूस केली. या घटनेमुळे मात्र पहाटे फिरणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
हेही वाचा - Pravin Darekar Case Filed : 'ठाकरे सरकार सूडबुद्धीने गुन्हा दाखल करत आहे'; आशिष शेलार