ETV Bharat / state

Rainfall review in Dhule district: धुळे जिल्ह्यात तीन जल प्रकल्प ओव्हर फ्लो,नद्या देखील वाहाताय दुथडी भरुन - Three water projects overflow in Dhule district

धुळे जिल्ह्यात शुक्रवार पासून पावसाची (Rainfall review in Dhule district) संततधार सुरु होती. दोन दिवस तर पावसाचा जोर कायम होता. परिणामी जिल्ह्याचा पश्चिम पट्टा असलेल्या साक्री तालुक्यातील कान, पांझरा नदी दुथडी (Rivers also overflow in Dhule Dist) भरुन वाहू लागली. जिल्ह्यातील बारा जलप्रकल्पांपैकी पांझरा, मालनगांव, जामखेडी ही जल प्रकल्प (Three water projects overflow in Dhule district) ओव्हर फ्लो झालीत.

overflow tank
जल प्रकल्प
author img

By

Published : Jul 12, 2022, 5:16 PM IST

धुळे: जिल्ह्यात शुक्रवार पासून पावसाची (Rainfall review in Dhule district) संततधार सुरु होती . दोन दिवस तर पावसाचा जोर कायम होता . परिणामी जिल्ह्याचा पश्चिम पट्टा असलेल्या साक्री तालुक्यातील कान, पांझरा नदी दुथडी (Rivers also overflow in Dhule Dist) भरुन वाहू लागली . साक्री तालुक्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. जिल्ह्यातील बारा जलप्रकल्पांपैकी पांझरा, मालनगांव, जामखेडी ही जल प्रकल्प ओव्हर फ्लो (Three water projects overflow in Dhule district) झालीत. मंगळवारी सकाळपासून पावसानं उसंत घेतल्यानं चार दिवसानंतर धुळे जिल्ह्यात सूर्य दर्शन झाले. एकीकडे या पावसामुळे काही अंशी नुकसान झाले असले तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झालीय. दरम्यान, धुळे शहरातील अशोक नगर जलकुंभ परिसरात असलेल्या रखवालदाराच्या निवास स्थानाचा स्लॅब कोसळला. सुदैवानं याठिकाणी कोणीही राहत नसल्यानं कुठलीही जीवित हानी झाली नाही .

नदी व जल प्रकल्प ओव्हर फ्लो: पाटबंधारे विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील बारा जलप्रकल्पांपैकी पांझरा, मालनगांव, जामखेडी ही जल प्रकल्प ओव्हर फ्लो झालीत. जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये १२ जुलै अखेर ३५.८६ टक्के जलसाठा झालाय. गेल्या वर्षी हा जलसाठा केवळ २२.६१ टक्केच होता. पांझरा, कान नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धुळे शहराच्या मध्यभागातून वाहणारी पांझरा नदी दुथडी वाहत आहे. कालिका माता मंदिराजवळ असलेला फरशी पुलावरून पुराचे पाणी गेलं असल्यानं हा पूल बंद करण्यात आलाय. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

शेती, जन जीवनावर परिणाम : लगडवाळ येथील गाव तलाव फुटल्यामुळे २५ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालंय. बुरुडखे येथील पाझर तलावाचे गेटमधून लिकेज होत असल्याने चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालंय. बुराई नदीला आलेल्या पुरामुळे आखाडे गावाजवळ दोन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून शेती पिकाचे नुकसान झाल्याचं, तहसीलदारांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय.

साक्री तालुक्यातील दहिवेल गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात पुराचे पाणी घुसल्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे. येशील सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढून डिस्चार्ज देण्यात आला आहे. साक्री शहरालगत कान नदीला पूर आल्यानं तीन लोकांना पुरातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीकाठी राहणाऱ्या लोकांची पर्यायी व्यवस्था स्थानिक मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. घरांची पडझडीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र पुरामुळे दोन जनावरे मृत पावली आहे. अशी माहिती साक्री तहसीलदारांनी दिलीय.

हेही वाचा: India Floods : गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.