धुळे - साक्री तालुक्यातील धाडणे गावात आदिवासी वस्तीत आग लागून झोपड्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
साक्री तालुक्यातील धांडणे गावात शनिवारी (दि. 7 मार्च) रात्री दहाच्या सुमारास आदिवासी वस्तीत अकरा झोपड्या जळून खाक झाल्याची घटना घडली. यात 13 कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार मंजुळा गावित यांनी धाडणे गावाला भेट देत नुकसानग्रस्तांची विचारपूस केली. आपत्कालीन विभागाकडे घटनेचा पंचनामा करून योग्य ती मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
गावातील बचत गटामार्फत त्या कुटुंबीयांना खाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. आगीचे कारण समजले नसले तरी ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. त्यांनी आम्हाला शबरी आवास योजनेअंतर्गत घरे प्राप्त करून द्यावी, अशी मागणी देखील केली आहे.
हेही वाचा - विमानतळाबरोबरच शहरालाही संभाजी महाराजांचे नाव द्या - संभाजीराजे भोसले