धुळे: जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा 248 वर - धुळे कोरोना
धुळे जिल्ह्यात रविवारी रात्री 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 248 वर जाऊन पोहचली आहे. धुळे जिल्हा रुग्णालयातून रविवारी 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

धुळे - जिल्ह्यात रविवारी (दि. 7 जून) रात्री तब्बल दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 248 झाली आहे. जिल्ह्यात दिवसागणिक वाढणारी संख्या ही चिंताजनक झाली आहे.
धुळे जिल्हा रुग्णालयातून रविवारी (दि. 7 जून) 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून शिरपूर तालुका देखील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. शिरपूर तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 62 झाली आहे. त्यात शिरपूर शहरातील 55 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 112 जणांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत सुरू होत असतानाच जिल्ह्यातील कोरोना बधितांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - धुळे कोरोना अपडेट : बाधितांना दिले जातायेत व्यायामाचे धडे