ETV Bharat / state

Tanker Accident : सुसाट टँकरची वाहनांना धडक, दोन किरकोळ तर एकजण गंभीर जखमी - tanker collides car rickshaw two wheeler

धुळे शहरातील शिव तिर्थ चौक ते फाशीपूल दरम्यान सुसाट टँकरने अनेक वाहनांना धडक ( Tanker Collides Car Rickshaw Two Wheeler) दिली. या अपघातात दोन जखमी तर एकाची अवस्था गंभीर आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुसाट टँकरची वाहनांना धडक,
सुसाट टँकरची वाहनांना धडक,
author img

By

Published : Jan 8, 2023, 6:31 PM IST

व्हिडिओ

धुळे : धुळे शहरातील शिव तिर्थ चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टँकर चालकाने शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास चार वाहनांना धडक दिली ( tanker collides car rickshaw two wheeler ) आहे. या घटनेत दोन जण जखमी झालेत. एक कार चालक गंभीर जखमी असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली ( two injured one in serious condition ) आहे. या अपघाताच्या घटनेनंतर धुळे शहरात अफवांना पेव फुटले होते. मात्र कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन आहे.

दोन जखमी तर एकाची अवस्था गंभीर : धुळे शहरातील शिवतिर्थ चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टँकर चालकाने शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास चार वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत दोन जण जखमी झालेत. एक कार चालक गंभीर जखमी असल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली. या अपघाताच्या घटनेनंतर धुळे शहरात अफवांचे पेव फुटले होते. मात्र पोलिसांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ( Police Appeal Not To Believe Rumours ) केले.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन : शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास धुळे शहरातील शिव तिर्थ चौक ते फाशी पूल दरम्यान गुजरात पासिंग असलेला जी जे १६ - ए यू - ५१७५ या क्रमांकावरील टँकर चालकाने एका मारुती व्हॅन, एक रिक्षा आणि एक दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत ओमीनी व्हॅनमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील अन्य एक जण जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणी जखमी कुठल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत का ? याची देखील माहिती पोलीस घेत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले.

शहरात अफवांना पेव : या अपघातानंतर धुळे शहरात अफवांना पेव फुटले होते. मात्र पोलिसांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे जखमींची पाहणी केली. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन धुळेकर नागरिकांना केले आहे. टँकर चालक हा नशेमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्रसिंग सकट असे टँकर चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपला काही लोक पाठलाग करत होते, त्यामुळे आपण न कळत शहरात प्रवेश केला असे टँकर चालकाने प्रथमदर्शनी म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सत्य परिस्थिती काय हे पोलीस चौकशीत समोर येईलच असे देखील अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.