ETV Bharat / state

Dhule Traffic Police: धुळ्यात लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात - २०० रुपयांची लाच

दोनशे रुपयांची लाच घेणे ट्राफिक हवालदारस चांगलेच महागात पडल आहे. वाहतूक पोलिसांच्या जाचाला कंटाळलेल्या वाहनचालकाने एका पोलीस कर्मचारीला चांगलीच अद्दल घडविली असून, त्याला २०० रुपयांची लाच घेताना पकडून दिल्याची घटना धुळे शहरात बुधवारी दुपारी घडली. उमेश सूर्यवंशी असे या पोलीस कर्मचारीचे नाव आहे.

Traffic Police
पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
author img

By

Published : May 3, 2023, 8:10 PM IST

माहिती देताना पोलीस उपअधीक्षक

धुळे : जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील एका लहान व्यावसायिकाचे धुळे शहरात रोज येणे-जाणे आहे. कामानिमित्त येणाऱ्या वाहन चालकाला धुळे शहरात बारा पत्थर चौकात नेहमीच अडविले जात होते. ऑनलाइन मोठ्या रक्कमेचा दंड आकारण्याची धमकी देऊन वाहतूक पोलीस त्यांच्याकडून कधी २०० तर कधी ५०० रूपये तडजोडीची रक्कम वसूल करत होते. वाहतूक पोलिसांच्या या नेहमीच्या जाचाला हा वाहनचालक कंटाळला होता. वाहतूक पोलिसांच्या ड्युटी सतत बदलत असतात. बारा पत्थर चौकात ३ हे रोजी उमेश दिनकर सूर्यवंशी या पोलीस कर्मचारीची ड्युटी होती. सदर वाहनचालक वारंवार दंड भरतो आहे, हे लक्षात आल्यावर उमेशची सूर्यवंशी याची हिम्मत वाढली. त्याने दंडाऐवजी त्याला लाचेची मागणी केली.

अशी घडविली अद्दल: संबंधित वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक आपल्याला आर्थिक आणि मानसिक त्रास देत असल्याने, त्रस्त वाहन चालकाने त्याला अद्दल घडविण्याचे ठरविले. आपल्याकडे पैसे नसल्याने पैसे घेऊन येतो असे सांगून सदर वाहनचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. तसेच एसीबीने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी गेला. तोपर्यंत एसीबीने सापळा रचला होता. एक पोलीस कर्मचारी त्या वाहन चालकाच्या सोबत दिला. शहरातील बारा पत्थर परिसरात उमेश सूर्यवंशी हा नेहमीप्रमाणे उभा होता. उमेश सूर्यवंशीने त्या वाहन चलाकाला ओळखले आणि गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर उमेशने दोनशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे लाचेची मागणी उमेश सूर्यवंशी करत असल्याचे सिद्ध झाले. त्याच ठिकाणी २०० रुपयांची लाच स्वीकारताना उमेशला एसीबीने रंगेहात पकडले.

एसीबीच्या या पथकाने केली कारवाई: धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण नेहाळदे, वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: MLA Rajan Salvi ACB Inquiry Case बांधकाम विभागाकडून घराचे मूल्यांकन करताना राजन साळवी यांना भावना अनावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.