ETV Bharat / state

धुळ्यात बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक; पोलीस संरक्षण देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

धुळे आगारातून आज (रविवारी) सकाळी पोलीस बंदोबस्तात बसेस काढण्यात आल्यानंतर काही तासातच अज्ञातांकडून या बसेसवर दगडफेक करून बस फोडल्याची घटना घडली आहे. (stones thrown by unknowns on st buses in dhule) या घटनेत जवळपास चार बसेसचे नुकसान झाले आहे.

Stones thrown by unknowns on st buses in Dhule
धुळ्यात बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक
author img

By

Published : Nov 21, 2021, 6:59 PM IST

Updated : Nov 21, 2021, 7:15 PM IST

धुळे - आगारातून आज (रविवारी) सकाळी पोलीस बंदोबस्तात बसेस काढण्यात आल्यानंतर काही तासातच अज्ञातांकडून या बसेसवर दगडफेक करून बस फोडल्याची घटना घडली आहे. (stones thrown by unknowns on st buses in dhule) या घटनेत जवळपास चार बसेसचे नुकसान झाले आहे. (four buses damaged) यातील धुळे ते नरडाणा या (dhule to nardana bus) बसचा चालक विजय भामरे हे जखमी झाले आहेत. (st driver injured) याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (west devpur police station)

बसचालक याबाबत बोलताना

जखमी बसचालक विजय भामरे याबाबत काय म्हणाले?

मी 2019मधील सरळसेवा परीक्षेतील उमेदवार आहे. दोन दिवसांपूर्वीच मी महामंडळात रुजू झालो. आज आम्हाला डीसींकडून बसेस काढण्याचे आदेश मिळाले होते. यानुसार आम्ही धुळे-नरडाणा बस काढली होती. परत येताना नगावबारी येथे अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. यात माझ्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. यानुसार आम्ही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानतंर आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत पोलीस संरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही बसेस काढणार नाहीत, अशी भूमिकाही या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा - ST Strike : आमचे सरकार असताना तरी कुठे झाले एसटीचे विलीनीकरण? - जानकर

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) शासनात विलीनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे अनेक आगारांतील बसची चाके पुन्हा जागच्या जागीच थांबली आहेत. बस वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींची झळ बसत आहे. मात्र, आमच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील, अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या.

Last Updated : Nov 21, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.