ETV Bharat / state

Four Wheller Theft Case: धुळे जिल्ह्यातून चोरलेली मालवाहू बोलेरो मध्यप्रदेशात सापडली, चोर मात्र फरार - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी येथून सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली मालवाहू बोलेरो गाडी मध्य प्रदेशात सापडली आहे. मात्र, पोलीस पोहोचण्याच्या आधीच चोर फरार झाले.

Four Wheller Theft Case
बोलेरो चोरी प्रकरण
author img

By

Published : Jul 11, 2023, 9:39 PM IST

धुळे : बोराडी येथून एम. एच. 18 बीजी ०२७० क्रमांकाची मालवाहू बोलेरो गाडी 6 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी जयंतीराम नारायणदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरीच्या वाहनाची मिळाली टिप : शिरपूर तालुक्यात सीमावर्ती भागात चारचाकी वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बोलेरो चोरीची टिप मिळाली होती. चोरीस गेलेले बोलेरो पिकअप वाहन मध्यप्रदेश गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात कालियावाव ता. भाबरा जि. अलीराजपुर येथे आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. तसेच या वाहनास जी जे ० वाय. झेड. 75 70 हा बनावट क्रमांक लावला असून ते वाहन बबलू कालू चव्हाण (रा. कालियावाव) याच्या राहत्या घरासमोर लावले असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

वाहन हाती लागले; पण आरोपी पसार: त्यानुसार एलसीबीचे पथक मध्यप्रदेश राज्यात रवाना झाले. पथकाने या ठिकाणी जाऊन वाहन व आरोपींचा शोध घेतला. परंतु, पोलिसांचा सुगावा लागतात संशयित आरोपी बबलू चव्हाण पसार झाला. यावेळी एलसीबीच्या पथकाने त्याच्या घरासमोर पार्क केलेले बोलेरो पिकअप वाहन हस्तगत केले.

'या' पोलीस पथकाने केली कारवाई: ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस नाईक मायुस सोनवणे, पंकज खैरमोडे, कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळे, किशोर पाटील, मयूर पाटील, योगेश जगताप, सुनील पाटील आणि अमोल जाधव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा:

  1. Karnataka Crime News : कर्नाटकचा 'लखोबा लोखंडे', डॉक्टर असल्याचे भासवून तब्बल 15 मुलींशी केले लग्न
  2. Husband Murder Case Nashik : पतीला गाढ झोपेत असताना पत्नीने मुलासोबत मिळून धाडले यमसदनी; हत्येचे 'हे' धक्कादायक कारण
  3. Tomato Truck Stolen : आता होतेय टोमॅटोची चोरी! बेंगळुरूमध्ये टोमॅटोने भरलेला पिकअप ट्रक चोरट्यांनी पळवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.