ETV Bharat / state

Shivsena Rada in Raosaheb Danave Programme : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की; पाहा व्हिडिओ - Dondaicha Railway Station

Shivsena Rada in Raosaheb Danave Programme : धुळ्यातील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी दानवेंना निवेदन देण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केलाय.

रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की
Shivsena Rada in Raosaheb Danave Programme
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 5:03 PM IST

रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की

धुळे Shivsena Rada in Raosaheb Danave Programme : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच राडा घातलाय. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. उधना ते भुसावळ मेमू रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी रावसाहेब दानवे शुक्रवारी रात्री दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आले होते. तेव्हा हा प्रकार घडला. या घटनेप्रकरणी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर काही तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. (Raosaheb Danve in Dondaicha)

दानवेंच्या समोर जोरदार घोषणाबाजी : दोंडाईचा शहरातील दाऊळ रस्त्यावर उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करुन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोंडाईचा रेल्वेस्थानकावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवेदन देण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्यानं मंत्री दानवेंच्या समोरच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राडा केला. यामुळे काहीवेळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

विविध मागण्यांचे निवेदन : दोंडाईचा शहरातील दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट दर पंधरा ते वीस मिनिटांनी बंद होतं. या रेल्वे गेट मार्गाने दाऊळ, मंदाणे, झोतवाडे, शेंदवाडे, साहूर तावखेडा व सिंधी कॉलनीसह जुने शहादा रोडवरील रहिवासी व शालेय विद्यार्थी प्रवास करतात. परंतु, रेल्वेच्या फेऱ्या अधिक असल्याने हे गेट सतत बंद होते. यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी दाऊळ रस्त्यावर उड्डाणपूल उभारावा अथवा भुयारी मार्ग करावा. तसंच नंदुरबार, दोंडाईचा, अंमळनेर, जळगावकडून चाळीसगावमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सुरू करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते दोंडाईचा रेल्वे स्थानकावर ठाण मांडून बसले होते. त्याठिकाणी मंत्री दानवे आल्यानंतर त्यांना निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे आले. मात्र, या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा :

  1. Dhule Riot : आदिवासी दिनाचे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटात दंगल, आमदारांच्या गाडीसह 8 वाहने फोडली
  2. ATM Cash Theft Case Nandurbar : एटीएम व्हॅनमधील रक्कमेवर कर्मचाऱ्याचाच डल्ला, तब्बल एक कोटी पाच लाख रुपये लंपास
  3. Road Accident News: ट्रॅक्टर कारच्या अपघातात कार चालकाचे शिर-धडापासून वेगळे; धुळे सोलापूर महामार्गावरील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.