ETV Bharat / state

धुळ्यात शिवसेना वर्धापन दिन साजरा, कार्यकर्त्यांकडून नियमांचे उल्लंघन - shivsena dhule city

कोरोना महामारीच्या संकट काळात नागरिकांनी गर्दी टाळावी आणि सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करावे. तसेच चेहऱ्याला मास्क लावावा, हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.

shivsena 54th anniversary celebrated in dhule city
धुळे महानगर शिवसेना शाखेच्यावतीने मुख्य कार्यालयात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले
author img

By

Published : Jun 19, 2020, 3:52 PM IST

Updated : Jun 19, 2020, 4:17 PM IST

धुळे - शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज (शुक्रवार) शिवसेनेच्या धुळे शाखेच्यावतीने मुख्य कार्यालयात भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. ध्वजारोहण दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. तसेच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मास्क न लावल्याने सरकारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा शहरभर रंगली होती.

धुळे महानगर शिवसेना शाखेच्यावतीने मुख्य कार्यालयात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले

जून 19, हा दिवस शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आहे. या दिवसानिमित्त प्रत्येक जिल्हास्तरावर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी एकत्र येऊन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा आदेश पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. या आदेशानुसार धुळे शहर शिवसेना शाखेच्या वतीने मुख्य कार्यालयात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा... मेळघाट व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला.. एकाच दिवसात करावे लागणार पर्यटन

कोरोना महामारीच्या संकट काळात नागरिकांनी गर्दी टाळावी आणि सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करावे. तसेच चेहऱ्याला मास्क लावावा हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र, शिवसेनेच्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून शासनाच्या या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.

Last Updated : Jun 19, 2020, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.