ETV Bharat / state

धुळ्यात शिरपूर येथून पोलिसांनी जप्त केली ५ लाखांची रोख रक्कम - शिरपूर तालुका पोलीस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्र आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

शिरपूर तालुका पोलीस
author img

By

Published : Oct 13, 2019, 2:03 PM IST

धुळे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्र आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पळासनेर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर एका वाहनातून पोलिसांनी ५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे, ही रक्कम कोठे नेली जात होती तसेच कोणत्या कामासाठी नेली जात होती याचा पुढील तपास सुरू आहे.

धुळ्यात ट्रक लूटमारीतील दोघे ताब्यात; अन्य दोघांचा शोध सुरु

धुळ्यात शिरपूर येथून पोलिसांनी जप्त केली ५ लाखांची रोख रक्कम

जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पळासनेर जवळील राष्ट्रीय महामार्ग 3 वर गस्त घालीत असताना पथकाने (एमएच 18, 9099) क्रमांकाच्या एका वाहनाची तपासणी केली असता, या वाहनातील एका बॅगेत पाचशे रुपये दराच्या आठशे चलनी नोटा असे ४ लाख आणि दोनशे रुपये दराच्या पाचशेच्या नोटा असे १ लाख अशी एकूण ५ लाख रुपयांची रक्कम आढळून आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सध्या अवैध दारू शस्त्र आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची विशेष मोहीम सुरू आहे, या मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेली रक्कम ही युवराज अरविंद शिंदे नामक व्यक्तीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत रोख रक्कम संबंधाने अधिक पुरावे, अभिलेख आणि संबंधित दस्तऐवज मागविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात अवैध दारू, शस्त्र आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पळासनेर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर एका वाहनातून पोलिसांनी पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे, ही रक्कम कोठे नेली जात होती तसेच कोणत्या कामासाठी नेली जात होती याचा पुढील तपास सुरू आहे.Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पळासनेर जवळील राष्ट्रीय महामार्ग 3 वर गस्त घालीत असताना पथकाने एम एच 18 9099 क्रमांकाच्या एका वाहनाची तपासणी केली असता, या वाहनातील एका बॅगेत पाचशे रुपये दराच्या आठशे चलनी नोटा असे ४ लाख आणि दोनशे रुपये दराच्या पाचशेच्या नोटा असे १ लाख अशी एकूण ५ लाख रुपयांची रक्कम आढळून आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सध्या अवैध दारू शस्त्र आणि रोख रक्कम हस्तगत करण्याची विशेष मोहीम सुरू आहे, या मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली, जप्त करण्यात आलेली रक्कम ही युवराज अरविंद शिंदे नामक व्यक्तीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत रोख रक्कम संबंधाने अधिक पुरावे, अभिलेख आणि संबंधित दस्तऐवज मागविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.