धुळे - जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ७० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७९५ झाली आहे. तर, गुरुवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या बघता नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करत तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील गुरुवारी आलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे -
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 14 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
1. चिलाने ७
2. विद्यानगर ३
3. नवा भोईवाडा १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४७ अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ३६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
1. ओतार गल्ली ४
2. वर्षी शिंदखेडा १
3. दादा गणपती गल्ली ३
4. आंबेडकर चौक २
5. सरस्वती कॉलनी १
6. तऱ्हाडी १
7. शिंगावे २
8. ईदगाह नगर १
9. खरदे बुद्रुक १
10.माली नगर १
11. गुजर खर्थे ३
12. आदर्श नगर १
13. शिवनगरी २
14.क्रांती नगर १
15. जैन गल्ली २
16. पांच कंदील चौक १
17. आर सी पटेल नगर १
18. गुजराथी गल्ली १
19. वरवाडे शिरपूर १
20. सुकवड शिरपूर १
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६४ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
1. बापू भंडारी गल्ली ३
2. गल्ली नंबर १० जुने धुळे ५
3. एसीपीएम (ACPM) कॉलेज १
4. मुकटी ३
5. स्नेह नगर १
महानगरपालिका पॉलीटेक्निक महाविद्यालय येथील ३२ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
1. कुमार नगर ६
2. इंदिरा कॉलनी दत्तमंदिर १
धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी ७९५ झाली असून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ३६५ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या शहरात सर्वाधिक असून यात २१४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच धुळे तालुक्यातील १५, शिंदखेडा तालुक्यातील २९, साक्री तालुक्यातील २३ तर अन्य जिल्ह्यातील २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.