धुळे - पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीने पाऊले उचलत असतानाच बियाणे खरेदी सुरू झाली आहे. परंतु धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे देऊन जास्तीचे खरेदी दाखऊन सबसिडी लाटण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने केंद्र सरकारची कशी लुबाडणूक केली जात आहे याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात समोर आला आहे.
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कमी खत खरेदी केली असताना त्यांच्या नावाने जास्त खत खरेदी केल्याचं दाखवलं जात असून, शेतकऱ्यांच्या नावाने जी सबसिडी लाटली जात आहे ती नेमकी कोणाच्या घशात जात आहे? याचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने सरकारची सुरू असलेली ही लुबाडणूक थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये खत विक्रेते हे शेतकऱ्यांच्या नावाने खोटी बिले तयार करून सबसिडी लाटत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. याबाबत तक्रारही करण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथील शरद पाटील या शेतकऱ्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. पाटील यांनी फक्त एक बॅक खताचे विकत घेतली होती, मात्र त्यांच्या नावाने 45 बॅग खरेदी खत खरेदी केल्याची नोंद करण्यात आली. तसा मेसेजही पाटील यांना मोबाईल वर आला. ज्या वेळेस पाटील यांनी याबाबत जाब विचारले त्यावेळेस दुकानदाराने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने अशा पद्धतीने अतिरिक्त खत खरेदी दाखवून अनुदान लाटले जात असेल तर ते चुकीचे आहे, हे अनुदान नेमकं कोण खात आहे? या मागचं सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शरद पाटील यांच्याप्रमाणे आणखीन शेतकऱ्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे.
भाजपा तालुकाध्यक्षांचा आरोप
ज्या पद्धतीने कमी खत घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने अधिक खत विक्री दाखवून बनावट बिल तयार करून अनुदान लाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शरद पाटील यांच्या पध्दतीनेच अजून अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट बिल तयार करण्याचं आल्याचा संशय भाजप तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केला असून या प्रकारची सविस्तर चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
कृषी अधीक्षकांचे म्हणणे -
रासायनिक खतांच्या विक्रीत होत असलेल्या या घोळाबाबत देवेंद्र पाटील यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून या प्रकरणी कृषी विभागाने चौकशीची आदेश दिले आहेत ... याबाबत अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई करणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
देशपातळीवर चौकशी होणे गरजेचे
अशापद्धतीने शेतकऱ्यांच्या नावाने खत कंपन्या आणि व्यापारी अनुदान लाटत असतील तर याची देशपातळीवर चौकशी होणे गरजेचे आहे. धुळे जिल्ह्यात हा प्रकार समोर आला असला तरी अन्य ठिकाणीही अशा स्वरूपाचे बनावट बिलं तयार करून शेकडो कोटी रुपये केंद्राकडुन लुबाडले जात नसतील का?, त्यामुळे चौकशी कधी होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा - पाचाड गावात 6 जूनपर्यंत कडक जनता कर्फ्यू; शिवराज्याभिषेकासाठी गर्दी करू नये ग्रामपंचायतीचे आवाहन