धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील एका रसायन कारखान्यात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास 2 बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून 65 पेक्षा अधीक लोक जखमी झाले आहेत. मात्र, या कारखान्यासंदर्भात अनेक बाबी समोर येत असून नागरिकांमध्ये रोष पसरत आहे.
हेही वाचा - अचानक स्फोट झाला, होरपळलेल्या लोकांना पाहून बेशुद्ध झालो; धुळ्यातील प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
आज शनिवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर वाघाडी येथील रसायन कारख्यानवर सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, हा कारखाना आहे कशाचा? यात नेमके काय काम केले जात होते? आणि हा कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? या संदर्भात कोणतीही माहिती नाही. दरम्यान, अशा बेकादेशीर चालवल्या जाणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
हेही वाचा - धुळे स्फोट प्रकरण; मृतांचा आकडा वाढण्याची भीती