ETV Bharat / state

शरद पवारांना पराभवाची भीती म्हणूनच ईव्हीएमवर शंका - रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला ७ ते ८ जागा मिळायला हव्यात, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा हा आम्हालाच होईल, असेही ते म्हणाले.

शरद पवारांना पराभवाची भीती म्हणूनच ईव्हीएमवर शंका
author img

By

Published : May 3, 2019, 8:25 AM IST

धुळे - लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. याचाच अर्थ त्यांना त्यांचा पराभव होईल, असा अंदाज आलेला आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. धुळ्यात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

बारामतीच्या जागेवरून शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पवार यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार यांनी गडचिरोली घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी ही चुकीची असून त्यांनी सरकारच्या पाठीशी उभे राहायला हवे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले.

शरद पवारांना पराभवाची भीती म्हणूनच ईव्हीएमवर शंका

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला ७ ते ८ जागा मिळायला हव्यात, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा हा आम्हालाच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:विधानसभा निवडणुकीत आरपीआयला ७ ते ८ जागा मिळायला हव्यात तसेच शरद पवार यांनी गडचिरोली घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी हि चुकीची असून त्यांनी सरकारच्या पाठीशी उभे राहायला हवे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात केले. धुळ्यात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त ते आले असतांना त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला.
Body:केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे गुरुवारी धुळे दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला. यावेळी बोलतांना रामदास आठवले म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला ७ ते ८ जागा मिळणे अपेक्षित आहे. शरद पवार यांनी गडचिरोली घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलतांना रामदास आठवले म्हणाले कि, शरद पवार यांनी अश्या पद्धतीने मागणी करणे चुकीचे आहे, अश्या प्रसंगात सरकारच्या पाठीशी त्यांनी उभे राहणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा आणि राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा हा आम्हालाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच बारामतीत आपला पराभव होईल असा अंदाज आल्याने त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे अशी टीका रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्यावर केली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.