ETV Bharat / state

धुळ्यात संततधार सुरुच; बुराई प्रकल्पाच्या साठ्यात वाढ - rivers in dhule

धुळ्यात संततधार सुरू आहे. यामुळे नद्यांच्या साठ्यातही वाढ झाली आहे. बुराई प्रकल्पाच्या साठ्यात वाढला असून शेतकरी आणि नागरिकांंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

धुळ्यात पावसाची संततधार
author img

By

Published : Jul 31, 2019, 11:37 PM IST

धुळे - शहरासह जिल्ह्यात आज खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणेसह माळमाथा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे रोहिणी नदी व वाजदरे येथील बुराई नदी दुथडी भरून वाहत असल्याने बुराई प्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होत आहे.

दुथडी भरुन वाहत आहेत धुळ्यातील नद्या
आज शहरात दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नकाणे व डेडरगाव तलावात अल्पसाठा होता. या दोन्ही तलावात पावसामुळे पुरेसा साठा झाला आहे. माळमाथा परिसरातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरू असून हा पाऊस पिकांना उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकरी व नागरिक सांगतात.

Intro:
धुळे शहरासह जिल्ह्यात आज खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली
साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे सह माळमाथा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने रोहिणी, नदी व वाजदरे येथील बुराई नदी दुथडी वाहू लागली असून बुराई प्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होत आहे.

विवो-: होण्यासाठी दमदार पावसाची धुळेकरांना प्रतीक्षा आहे.

Body:धुळे शहरासह परिसरात आज पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
आज सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सकाळी साडेनऊ वाजेनंतर वातावरणात बदल झाला दुपार नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली अर्धातास पावसाने शहराला झोडपून काढले. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. तसेच व्यवसायीकांचीही तारांबळ उडाली.
आज शहरात दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन उकाड्यापासुन हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नकाणे व डेडरगाव तलावात अल्पसाठा आहे. या दोन्ही तलावात पुरेसा साठा निर्माण झाला आहे. साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे सह माळमाथा परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने रोहिणी, नदी व वाजदरे येथील बुराई नदी दुथडी वाहू लागली असून बुराई प्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होत आहे. माळमाथा परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे,सदर पाऊस पिकांना उपयुक्त ठरणार आहे
दोन दिवसांपासून पावसाची निजामपूर परिसरात संततधार सुरू असल्याने रोहिणी नदी व वाजदरे, ब्राह्मणवेल,आखाडे भागातून वाहणारी बुराई नदी ही सद्यः स्थितीत दुथडी वाहत आहे, यामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.