ETV Bharat / state

धुळ्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांची आर्थिक लूट

सरकारी आणि खासगी शाळांना अभ्यासक्रमात शासनाने प्रकाशित केलेली पुस्तके लावणे बंधनकारक असते. मात्र, धुळे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडून ठराविक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यास जबरदस्ती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Private English medium schools hike Fee in Dhule
author img

By

Published : May 15, 2019, 5:04 PM IST

धुळे - शहरातील विविध इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडून विशिष्ठ प्रकाशनाची पुस्तक विकत घेण्यास सांगून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. आपल्या पाल्यावर कारवाई होईल या भीतीने पालक प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्यास नकार देत आहेत. यावर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

धुळ्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांची आर्थिक लूट

शिक्षण क्षेत्रात चालणारा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार हा नवा राहिलेला नाही. खासगी शाळांकडून तर मोठया प्रमाणावर हा प्रकार चालतो. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. सरकारी आणि खासगी शाळांना अभ्यासक्रमात शासनाने प्रकाशित केलेली पुस्तके लावणे बंधनकारक असते. मात्र, धुळे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडून ठराविक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यास जबरदस्ती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची किंमत ही सर्वसामान्य पालकांना परवडणारी असते. मात्र, खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांची किंमत ही अव्वाच्या सव्वा असते. तरी देखील पालकांना ही पुस्तक खरेदी करावी लागतात. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या किंमतीवर कोणाचाही अंकुश नसल्याने यातून शाळा आणि प्रकाशक यांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहे. खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांच्या किंमती ठरवत कोण हा देखील प्रश्नच आहे. यातून पालकांची सर्रासपणे आर्थिक लूट सुरू आहे. शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची किंमत जर ६० रुपये असेल तर त्याच खाजगी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची किंमत ही १५० रुपये आहे. मात्र, पालकांना खाजगी प्रकाशनाची पुस्तक खरेदी करण्याची जबरदस्ती केली जात आहे. पाल्यांवर कारवाई होण्याची भीती असल्याने सध्या पालक प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्यास तयार नाही. या प्रश्नाकडे प्रशासन आणि शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष घालावे आणि पालकांची आथिर्क लूट थांबवावी अशी मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे.

Intro:धुळे शहरातील विविध इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडून विशिष्ठ प्रकाशनाची पुस्तक विकत घेण्यास सांगून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. पाल्यावर कारवाई होईल या भीतीने पालक प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्यास नकार देत आहेत. यावर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

Body:शिक्षण क्षेत्रात चालणारा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार हा नव्याने राहिलेला नाही. त्यात खाजगी शाळांकडून तर मोठया प्रमाणावर हा प्रकार चालतो. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. सरकारी आणि खाजगी शाळांना अभ्यासक्रमात शासनाने प्रकाशित केलेली पुस्तके लावणे बंधनकारक असते. मात्र धुळे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांकडून ठराविक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यास जबरदस्ती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची किंमत ही सर्वसामान्य पालकांना परवडणारी असते मात्र खाजगी प्रकाशनाची पुस्तकांची किंमत ही अव्वाच्या सव्वा असते.मात्र तरी देखील पालकांना ही पुस्तक खरेदी करावी लागतात. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या किंमतीवर कोणाचाही अंकुश नसल्याने यातून शाळा आणि प्रकाशक यांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहे. खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांच्या किंमती ठरवत कोण हा देखील प्रश्नच आहे. मात्र यातून पालकांची सर्रासपणे आर्थिक लूट सुरू आहे. शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची किंमत जर ६० रुपये असेल तर त्याच खाजगी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची किंमत ही १५० रुपये आहे. मात्र पालकांना खाजगी प्रकाशनाची पुस्तक खरेदी करण्याची जबरदस्ती केली जात आहे. पाल्यांवर कारवाई होण्याची भीती असल्याने सध्या पालक प्रसारमध्यमांसमोर येऊन बोलण्यास तयार नाही मात्र या प्रश्नाकडे प्रशासन आणि शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष घालावे आणि पालकांची आथिर्क लूट थांबवावी अशी मागणी पालकांकडून व्यक्त होत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.