ETV Bharat / state

Suicide News : पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी - note written before suicide

पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या ( Police Training Centre ) पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या ( police inspector committed suicide ) केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले. या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस कुणासही कारणीभूत धरू नये असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Suicide News
पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Nov 16, 2022, 9:27 AM IST

धुळे : धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या ( Police Training Centre ) पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या ( police inspector committed suicide ) केल्याची घटना घडली आहे. या मयत पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत कुणासही दोषी धरू नये असे लिहिले आहे. धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 2019 पासून प्रवीण विश्वनाथ कदम हे पोलीस निरीक्षक सेवेत होते. मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा बंद होता. त्यामुळे काही सहकाऱ्यांनी त्यांचा दरवाजा वाजवला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नसल्याने सहकाऱ्यांनी पाहिले असता कदम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली.

माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल : जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयत कदम यांच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले. या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस कुणासही कारणीभूत धरू नये असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मयत प्रवीण कदम हे पुणे येथून 2019 मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात आले होते. त्यांचा परिवार नासिक येथे राहत असल्याची माहिती मिळाली असून परिवाराला या संदर्भात कळवण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला हजेरी : धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 21 नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची हजेरी लागणार होती. यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवानांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण केंद्रात या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. या तयारीला दुपारी मयत पोलीस निरीक्षक कदम यांनी देखील हजेरी लावली. मात्र हा सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला. यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.