ETV Bharat / state

पेट्रोल पंपचालकांना पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली वाहण्याचा विसर

दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

author img

By

Published : Feb 21, 2019, 10:57 AM IST

Dhule

धुळे - दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यावेळी शहरातील पेट्रोल पंप सर्रासपणे सुरूच होते.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफच्या ४९ जवानांना हौतात्म आले. या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे. जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध संघटना आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. कँडल मार्च, मशाल रॅली या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. पाकिस्तानला धडा शिकविण्यात यावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी ७ वाजता पेट्रोलपंप बंद करून २० मिनिटे जवानांना आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालक संघटनेच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र, धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण धुळे शहरातील पेट्रोल पंप सर्रासपणे सुरू होते. यावरून शहरातील पेट्रोल पंप चालक किती जागरूक आहेत, याचा प्रत्यय आला.

undefined

Intro:दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडल्याच चित्र पाहायला मिळालं.

Body:पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफचे ४२ जवान शहीद झाले, या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे. शहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध संघटना आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. कँडल मार्च, मशाल रॅली या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, पाकिस्तानला धडा शिकविण्यात यावा अशी मागणी देशभरातून केली जात आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ७ वाजता पेट्रोलपंप बंद करून २० मिनिटे बंद ठेऊन शहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालक संघटनेच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण धुळे शहरातील पेट्रोल पंप सर्रासपणे सुरू होते. मात्र नागरिकांनी देखील याबाबत कोणतीही माहिती न देता पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. धुळे शहरातील पेट्रोल पंप चालक किती जागरूक आहेत याचा प्रत्यय यावरून आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.