धुळे - जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत महापालिकेची १८ हजार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीच्या माध्यमातून महापालिकेचा लाखो रुपयांचा कर संकलित झाला आहे. या लोकअदालतीसाठी नागरिकांनी जिल्हा न्यायालयात गर्दी केली होती.
हेही वाचा - धुळे जिल्हा परिषदेची निवडणुक पुढे ढकलण्याची शक्यता
धुळे महापालिकेच्या वतीने जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होत. महापालिकेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. यामुळे वारंवार माहिती देऊन देखील नागरिक थकबाकी भरत नसल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचे कर संकलन होत नाही. यापार्श्वभूमीवर या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत १८ हजार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीच्या माध्यमातून जवळपास १० हजाराहून अधिक नागरिकांनी आपला थकीत कर भरला. या माध्यमातून महापालिकेचा लाखो रुपयांचा कर संकलित झाला आहे. नागरिकांनी वेळोवेळी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी केले.
हेही वाचा -. धुळे महानगरपालिकेचे डिजिटल पाऊल; मालमत्ता कर भरणे आता एका क्लिकवर