ETV Bharat / state

परिचारिका दिनाला धुळे जिल्हा रुग्णालयात धान्य वाटप - Corona Dhule

परिचारिका दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर तसेच धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ज्या गोरगरिबांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही, अशा सर्वांना याचा लाभ होईल.

परिचारिका दिन
परिचारिका दिन
author img

By

Published : May 12, 2021, 8:09 PM IST

धुळे - कोरोनासारख्या महामारीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे आज लाखो नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज परिचारिका दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर तसेच धान्य वाटप करण्यात आले.

परिचारिका दिनाला धुळे जिल्हा रुग्णालयात धान्य वाटप याबाबत माहिती देताना संघटनेच्या अध्यक्षा अधिपरिचारिका प्रतिभा घोडके
आद्यपरिचारिका 'फ्लोरेन्स नाईटिंगेल' यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज जागतिक परिचारिका दिन धुळे जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला. यावेळी परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा अधिपरिचारिका प्रतिभा घोडके म्हणाल्या, आम्ही जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधत आमच्या सहकार्‍यांसोबत सामाजिक दायित्व म्हणून, फूड बॅंकेच्या माध्यमातून संकलित झालेल्या धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे जिल्हा रुग्णालयात गरजूंना त्याचे वाटप केले. या उपक्रमामुळे ज्या गोरगरिबांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही, अशा सर्वांना याचा लाभ होईल. त्याचप्रमाणे राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरही आयोजीत केली जातायेत. त्याच पार्श्वभूमीवर आम्हीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामुळे राज्यसरकालाला रक्तदानाच्या स्वरूपात आमचीही थोडीफार मदत होईल हा आमचा उद्देश आहे. अशी प्रतिक्रिया प्रतिभा घोडके यांनी दिली.हेही वाचा - मुंबईत १११ म्यूकर मायकोसिसचे रुग्ण; बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील

हेही वाचा - ऑक्सिजन ऑडिटचे पुणे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम; ऑक्सिजनमध्ये बचत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.