ETV Bharat / state

मयूर सिसोदे हत्याप्रकरण: आरोपींचा अद्यापही शोध नसल्याने नरडाणा गावात 'बंद'; पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचा ठिय्या - murder case of mayur sisode

एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येच्या आरोपींचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे नरडाणा येथील गावकऱ्यांनी बंदची हाक मारीत थेट पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नरडाणा गावात कडकडीत बंद
author img

By

Published : Jul 24, 2019, 11:37 PM IST

धुळे - नरडाणा येथील मयूर सिसोदे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने गावात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच पोलीस प्रशासनाचाही निषेध करण्यात आला. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातही ठिय्या आंदोलन केले

नरडाणा येथील एका कंपनीत कार्यरत असलेला मयूर सिसोदे याची निर्घुण हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांचा केवळ तपास सुरु असून कोणालाही अटक अथवा पकडण्यात आलेले नाही. या घटनेचा तातडीने तपास करावा, मारेकऱ्यांना शोधून काढावे, या प्रमुख मागणीसाठी नरडाणा ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. ग्रामस्थांनी बंदची हाक देत नरडाणा पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी केली. मयूर सिसोदे खून प्रकरणी नरडाणा बाजारपेठ बंद करून ग्रामस्थांनी नरडाणा पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला. यावेळी शिरपूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्याशी मोर्चेकऱ्यांनी चर्चा केली.

पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याशी चर्चा करण्याची मागणी मोर्चेकऱयांनी केली होती. त्यामुळे नरडाणा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले होते. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Intro:नरडाणा येथील एका कंपनीत कार्यरत असलेला मयूर सिसोदे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने गावात बुधवारी कडकडीत बंद पाळून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. यामुळे गावात तणावाचं वातावरण पसरलं होत.

Body:
नरडाणा येथील एका कंपनीत कार्यरत असलेला मयूर सिसोदे याची निर्घुण हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांचा केवळ तपास सुरु असून कोणालाही अटक अथवा पकडण्यात आलेले नाही. या घटनेचा तातडीने तपास करावा, मारेक-यांना शोधून काढावे या प्रमुख मागणीसाठी नरडाणा ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.
ग्रामस्थांनी बंदची हाक देत नरडाणा पोलीस ठाणे गाठले आहे़ पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी केली. मयूर सिसोदे खून प्रकरणी नरडाणा बाजारपेठ बंद करून ग्रामस्थांनी नरडाणा पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला. यावेळी शिरपूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्याशी मोर्चेक-यांनी संवाद साधला.पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याशी चर्चा करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली असून नरडाणा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केले़ पोलिसांचाबंदोबस्त तैनात आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे गावात तणावाचं वातावरण पसरलं होत. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.