ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे धरणे आंदोलन - धुळे जिल्हा बातमी

अनलॉकमध्ये सर्वकाही सुरू होत आहे. बाजारपेठ पूर्वपदावर येत आहेत. असे असताना अद्यापही लग्नसमारंभ आणि त्यासंबंधी इतर व्यवसायांना परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या आठ महिन्यांपासून लग्न समारंभावर अवलंबून असलेले सर्व व्यावसाय ठप्प आहेत. या व्यावसायांना परवानगी देण्यासाठी आज धुळ्यात आंदोलन करण्यात आले.

Dhule District Mandap Decorators Association news
धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे आंदोलन
author img

By

Published : Nov 2, 2020, 6:53 PM IST

धुळे - अनलॉकमध्ये सर्वकाही सुरू होत आहे. बाजारपेठ पूर्वपदावर येत आहेत. असे असताना अद्यापही लग्नसमारंभ आणि त्यासंबंधी इतर व्यवसायांना परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या आठ महिन्यांपासून लग्न समारंभावर अवलंबून असलेले सर्व व्यावसाय ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने अशा व्यावसायांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्यावतीने सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे आंदोलन

धुळे शहरातील जेल रोड येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश तलवारे यांनी सांगितले की, सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाला कमीत कमी 500 लोकांना उपस्थित रहायला सरकारने परवानगी द्यावी. तसेच टेंट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, डी. जे. साऊंड, लाइट, डेकोरेट यांच्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. त्याच्यामध्ये सुट देऊन तो 5 टक्के करावा. अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आज आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलन करत आहोत.

  • काय आहेत मागण्या..

    मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के आसन क्षमतेला परवानगी देण्यात यावी.

    व्यवसाय संदर्भातील संबंधित 18 टक्के जीएसटीवरून पाच टक्‍क्‍यांवर करावा.

    भाड्याचे गोदाम असणाऱ्यांचे भाडे माफ करावे.

    कर्जदारांचे व्याज माफ करावे.

    ईएमआय स्थिती सामान्य होईपर्यंत स्थगित करावे.

    सर्व मंडप व्यवसाय धारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा.

    व्यवसायाच्या संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करावी.

    आंदोलनाने वेधलं नागरिकांच लक्ष

धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यवसायिकांनी घोडा तसेच मिरवणुकीसाठी लागणारी बग्गी आंदोलनस्थळी आणली होती. यामुळे या आंदोलनाने सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.