धुळे Molestation Case Against Police Officer : शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर हेमंत पाटील यांना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत; (Dhule Crime) परंतु पोलिसांच्या हाती अजून ते लागलेले नाहीत. प्रकरण घडल्यानंतर हेमंत पाटील हे विनापरवानगी रजा टाकून निघून गेले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांना दिली. हेमंत पाटील यांच्या विरोधात धुळे शहरात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्षपातीपणे चौकशी केली जाणार असल्याचंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं.
पोलीस अधिकाऱ्याचा महिलेला अश्लील कॉल: पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, "धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील (हल्ली नेमणूक नंदुरबार जिल्हा) यांनी सन 2022 पासून ते 11 नोव्हेंबर 2023 पावतो पीडित महिलेकडं शारीरिक सुखाची मागणी केली. अश्लील वक्तव्य करुन मोबाईल व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करुन पीडित महिलेस त्रास दिला. सांगितल्याप्रमाणं न केल्यास तुझी समाजात बदनामी करेल, त्याचप्रमाणं वेळोवेळी व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करुन, नग्न अवस्थेत व्हिडिओ रेकॉर्ड करुन न पाठवल्यास ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत कुठं वाच्यता केली असता पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली" असं त्यांनी यावेळी सांगितलं.
आरोपीच्या महिलेला धमक्या : याप्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरुन "मुख्य आरोपी तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील यांच्याविरुद्ध तसेच त्यांचा सहआरोपी यांनी पीडित महिलेला वेळोवेळी फोन करुन धमकावलं. याप्रकरणी 11 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री देवपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त पथकं रवाना करण्यात आली आहेत. हे प्रकरण संवेदनशील असून त्याचा सखोल तपास चालू आहे", असं पोलिसांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले.
पोलिसांचं आवाहन: "कोणीही मुलगी अगर महिला यांनी कोणाचीही भीती अगर भय न बाळगता त्यांच्याविरुद्ध झालेल्या अन्याय व अत्याचाराच्या घटनेची तक्रार दाखल करावी. महिलां विरुद्धच्या अन्याय आणि अत्याचाराच्या घटनेमध्ये आरोपी कोणीही असला, तरी त्याची गय केली जाणार नाही", असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा:
- Man Beaten Woman Teacher : अश्लील मेसेज पाठवल्यानं महिला शिक्षिकेची पोलिसात तक्रार; राग आल्यानं आरोपीकडून पीडितेला मारहाण
- Teacher Sexually Assaulting Student : अमरावतीत शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा शाळेत राडा
- Unnatural Sex With Student : संस्थाचालकानं विद्यार्थ्याला तेल लावायला बोलवलं अन्....; संस्थाचालकाला अटक