धुळे - मध्यप्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथील नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. यामध्ये एकूण 40 प्रवासी होते. या भीषण अपघातात बसच्या वाहनचालकासह आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या इंदोरला जाणाऱ्या ड्युटीसाठी वाहक प्रकाश चौधरी जात होते. मात्र, ही ड्युटी करण्यासाठी अमळनेर डेपोतील वाहक मनोज पाटील ( Conductor Manoj Patil ) आग्रही होते. पण, ऐनवेळी त्यांनी त्यांचा निर्णय रद्द केला. आज ( 18 जुलै ) सकाळी जेव्हा या बसच्या अपघाताची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली तेव्हा सर्वांना धक्का बसला. तर, मनोज पाटील यांच्या पायाखालची जमीनच ( Maharashtra Bus Accident Into Narmada River ) सरकली.
'दैव बलवत्तर म्हणून...' - वाहक मनोज पाटील इंदोर ड्युटीला जाण्यास इच्छुक होते. मागील रविवारी देखील त्यांनी अमळनेर-इंदोर ही ड्युटी केली होती. याबाबत 'ईटिव्ही भारत'ने मनोज पाटील यांच्याशी संवाद साधला. तेव्हा पाटील यांना अश्रू अनावर झाले. 'दैव बलवत्तर म्हणून आज मी जिवंत. मात्र, आपले दोन सहकारी आपल्याला सोडून गेले याचं अतीव दु:ख झालं आहे.
मनोज पाटील यांना मानसिक धक्का - दरम्यान, मनोज पाटील यांचा स्वभाव शांत, सर्वांना मदतीसाठी धावून जाणार आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघाताच्या बातमीने मनोज पाटील यांना अतीव दुःख झालं आहे. त्यांना मानसिक धक्का बसला आहे. आपल्या डेपोतील दोन चांगले सहकारी आपल्याला सोडून गेले याचं दुःख त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होतं. त्यांच्या फोनची कॉलर ट्यून देखील 'देवा काळजी रे... माझ्या देवा काळजी रे' ही आहे. त्यामुळे खरंच देवाला त्यांची काळजी होती, असे दिसत आहे.
इंदूरहून अंमळनेरला निघाली होती बस - इंदूरहून अंमळनेरकडे जाणारी महाराष्ट्र रोडवेजची बस धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून कोसळल्याने 13 जण ठार झाले आहेत. या अपघातातील १५ जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे, असे मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
तांत्रिक कारणामुळे अपघात - या पुलावरून जात असतानाच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील सुटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातग्रस्त बसला नदी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अपघातस्थळी एसटीचे अधिकारी रवाना झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या शोकसंवेदना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताची माहिती घेतली असून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, इंदूरहून अंमळनेरला जाणाऱ्या बसच्या अपघाताचे वृत्त धक्कादायक आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातस्थळी वेगाने कार्य सुरू असून आवश्यक ती मदत प्रशासन करीत आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेनंतर तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.
आठ मृतांची ओळख पटली - अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 9 पुरुष आणि 4 महिला आहेत. 8 जणांची ओळख पटली आहे. मध्य प्रदेश परिवहन विभागाचे अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समजेल असे शेखर चने (उपाध्यक्ष, एस टी महामंडळ) यांनी सांगितले. एसटी अपघातात चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश चौधरी (वाहक), निंबाजी आनंद पाटील, कमलाबाई आनंद पाटील, चेतन गोपाल जांगिड, जगन्नाथ हेमराज, सैफुद्दीन अब्बास, अरवा मूर्तजा यांचा मृत्यू झाला आहे. यातील काही अमळनेर, इंदूर आणि राजस्थानचे रहिवासी आहेत.
हेही वाचा - Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू