धुळे - जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील इच्छापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शंभर मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी मेंढपाळांनी केली.
हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार
मेंढपाळांनी रात्री सर्व मेंढ्या शेतात जाळीत सोडल्या होत्या. त्यानंतर शेतकरी घरी गेले. मात्र, सकाळी परतल्यावर त्यांना हा सर्व प्रकार दिसून आला. रात्री बिबट्याने या मेंढ्यांवर ताव मारला. यात जवळ-जवळ 50 मेंढ्या जखमी अवस्थेत आढळून आल्या आहेत. तर बिबट्याच्या हल्ल्यात काही मेंढ्यांनी धास्तीने जीव सोडला. तर काही मेंढ्या या मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. यात मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. मेंढपाळांनी वन विभागास या घटनेची माहिती दिली आहे. नुकसानीची भरपाई वनविभागाने मिळवून द्यावी, ही मागणी मेंढपाळांनी केली.