ETV Bharat / state

धुळे; अन् भूमिहीन शेतकरी महिला झाल्या आत्मनिर्भर

author img

By

Published : Mar 16, 2021, 5:12 PM IST

Updated : Mar 16, 2021, 7:57 PM IST

धुळे जिल्ह्यात बचट गटांची मोहीम यशस्वी झालेली असताना आता महिला सक्षमीकरणासाठी दुसऱ्या पर्यायावर काम सुरू आहे. यात खास करून ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकरी व शेतमजूर महिलांना प्राधान्य दिले आहे. ग्रामीण जीवन आजही बहुतांश शेतीवरच अवलंबून असल्याने शेती हाच अर्थक्रांतीचा पाया मानला जातो.

अन् भूमिहीन शेतकरी महिला झाल्या आत्मनिर्भर

धुळे- गावखेड्यातील शिक्षित, अल्पशिक्षित महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न आजवर झाले आहेत. लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचतगट ही चळवळ सुरू झाली. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनविण्याबारोबरच रोजगार निर्मिती करून इतर महिलांचे देखील सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी जिल्ह्यातील बचत गट पूरक ठरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सहकार चळवळीसोबतच आता बचतगटांची सुरू असलेल्या चळवळीचा उल्लेख आवर्जून केला जात आहे. बचतगटांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांना उद्योग, व्यवसायासाठी सुलभ अर्थपुरवठा केला जात असल्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण घडून येत आहे.

सामाजिक संस्था आणि जिल्हा बँकेचा पुढाकार

महिला बचत गट ही केवळ एक योजना बनून राहिलेली नाही तर महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ बनली आहे. यामुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्व:विकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण होत आहे. स्वयं सहायता बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सन १९९४ मध्ये शासनाने महिला सबलीकरण व सक्षमीकरण धोरण जाहीर केले. या धोरणातूनच महिला बचत गटांना सुरुवात झाली. यासाठी प्रभात विकास मंच धुळे, नाबार्ड सरकारी यंत्रणांसह सामाजिक संस्था आणि जिल्हा बँकेचा देखील पुढाकार राहिला आहे. बचतगटाच्या माध्यामातून एकत्रित आलेल्या महिलांना गांडूळ खत, शेती व शेतीपूरक उद्योग, कुटीर उद्योग, सामूहिक शेती, कुक्कुटपालन, शेळी व म्हैस पालन, मळणीयंत्र, शेती यांत्रिकीकरण उपकरणे, गारमेंट्स, पार्लर, नर्सरी, कॉम्प्युटर लॅब, घरगुती खाद्य पदार्थ आदी अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी अर्थपुरवठा करुन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यात आले आहे. हे प्रयत्न आजही निरंतर सुरू आहेत. बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योगाबरोबर अनेक महिलांना घरबसल्या रोजगार निर्माण झाला आहे. प्रत्येक बचत गटामध्ये दहापासून ५० महिलांचा समावेश असल्याने सद्य:स्थितीला लाखो महिला बचतगट चळवळीत कार्यरत राहून आर्थिक सक्षम बनल्या आहेत.

हेही वाचा- Corona Live Update : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात कडक निर्बंध

भूमिहीन शेतकरी महिलांचे संयुक्त देयता समूह
जिल्ह्यात बचट गटांची मोहीम यशस्वी झालेली असताना आता महिला सक्षमीकरणासाठी दुसऱ्या पर्यायावर काम सुरू आहे. यात खास करून ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकरी व शेतमजूर महिलांना प्राधान्य दिले आहे. ग्रामीण जीवन आजही बहुतांश शेतीवरच अवलंबून असल्याने शेती हाच अर्थक्रांतीचा पाया मानला जातो. आजची शेती यांत्रिक पद्धतीने कसली जात असल्याने शेती क्षेत्रात यांत्रीकरणाचा ओघ सातत्याने वाढत आहे. शेती औजारांचे नवनवीन शोध लावले जात आहेत. तरी देखील शेतीमध्ये राबणाऱ्या मजुरांसाठी पूर्णपणे पर्याय उपलब्ध झालेला नाही. कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण आणि हिस्से वाटणीमुळे पदरी असलेल्या शेतजमीनीचे तुकडे पडत आहेत. यामुळे कमी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने मजुरांकरवी शेती कसून घेतली जाते. ग्रामीण भागात पुरुषांबरोबरच महिला देखील शेतीत राबताना दिसून येतात. शेतीत काम करणाऱ्या बहुतांश महिला या भूमिहीन असतात. यामुळे शेतकरी महिला भाडेतत्वाने, बटाईने शेती करतात. परंतु भूमिहीन महिलांना पीककर्ज, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक प्रगतीवर मर्यादा येतात. भाडेतत्वाने किंवा बटाईने शेती कसण्याची इच्छा असूनही पदरी पैसा नसल्याने शेती करू शकत नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या ग्रामीण भागात मोठी आहे. यात महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश असल्याने अशा भूमिहीन महिलांना एकत्र आणण्याचे काम राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू झाले आहे. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विवेक पाटील यांनी स्वंयसेवी संस्थेची मदत घेत भूमिहीन शेतकरी महिलांचे संयुक्त देयता समूह स्थापन करून त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

भाडेतत्वाने आणि बटाईने शेती

या उपक्रमात प्रभात विकास मंच या स्वंयसेवी संस्थेचा सहायोग लाभला आहे. प्रभात विकास मंचचे अध्यक्ष विनोद पगार यांनी प्रथमत: धुळे तालुक्यातील भूमिहीन शेतकरी महिलांचे संयुक्त देयता समूह (जेएलजी) स्थापन केले. चार ते पाच महिला शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांना जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. या मिळालेल्या अर्थसहायाने धुळे तालुक्यातील महिलांनी भाडेतत्वाने आणि बटाईने शेती करण्यास सुरुवात केली आहे. शेतीत भाजीपाला उत्पादित करून शहरातील बाजारपेठेत विक्री करीत आहेत. यामुळे महिला शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे अर्थाजन होत आहे.

प्रभात विभाग विकास मंचचा उपक्रम
प्रभात विकास मंचच्या माध्यमातून धुळे तालुक्यात ५० संयुक्त देयता समूह स्थापन केले आहेत. या गटाच्या माध्यतातून सुमारे २५० महिला जोडल्या जाऊन उत्तम शेती करू लागल्या आहेत. न्याहळोद, निकुंभे, बोरीस यासह आदी गावात संयुक्त देयता समूह स्थापन झाले आहेत. या समुहाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांपासून अन्य भूमिहीन महिलांना देखील प्रेरणा मिळत असून या उपक्रमात त्या देखील सहभागी होऊ लागल्या आहेत. या उपक्रमातून केवळ भूमिहीन महिलाच नव्हेतर गावोगावी भटकंती करून टिकली, बांगडी, सुई-दोरा विक्री करणाऱ्या महिलांना देखील अर्थ सहाय करून त्यांच्या व्यवसायाची भरभराट होण्यास हातभार लावला जात आहे. खास करून कोरोना महामारीमुळे उदनिर्वाहाचा प्रश्न असलेल्या महिलांना जेएलजी समुहाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा जिल्ह्यात होत असलेला हा प्रयत्न खरोखरच स्तूत्य असाच म्हणावा लागेल.

हेही वाचा- Live Updates मनसुख हिरेन-वाझे प्रकरण : किरीट सोमैय्यांनी घेतली तिसऱ्यांदा हिरेन कुटुंबीयांची भेट

Last Updated : Mar 16, 2021, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.